Monday, April 15, 2024

‘चौक’चा विजयी चौकार! प्रेक्षकांच्या पसंतीस का उतरतोय चौक? जाणून घ्या

देवेंद्र अरूण गायकवाड दिग्दर्शित ‘चौक’ चित्रपटाने सलग तीन आठवडे जोरदार फटकेबाजी करत आता चौथ्या आठवड्याकडे मार्गक्रमण करत आहे. या आठवड्यात इतर बिग बजेट चित्रपट प्रदर्शित झालेले असतानाही ‘चौक’ने आपली जागा पक्की केली आहे आणि प्रेक्षकही या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद देत आहेत.

बहुचर्चित आणि मोठ्या प्रमाणात खर्च केलेल्या ‘आदिपुरूष’ या चित्रपटाला सोशल मीडियावर टिकेचे धनी व्हावे लागले, अशातच केवळ आशय आणि विषयामुळे चौक चित्रपटाला अजूनही प्रेक्षकांची गर्दी होत आहे. ( Chowk Marathi Cinema Story and earnings )

चौक चित्रपट हा तुमचा-आमचा चित्रपट आहे, समाजाचं प्रतिबिंब दाखवणारा तो आरसा आहे, हा चित्रपट पाहून नक्कीच समाजप्रबोधन होईल, अशा प्रेक्षकांच्या अनेक सकारात्मक प्रतिक्रिया चौक बघितल्यानंतर आल्या. चौक मल्टिस्टारर असल्याने कलाकारांचंही सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. तसेच चौक चित्रपटासोबत इतर भाषांतील अनेक बिग बजेट आणि बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित झालेले असतानादेखील ‘चौक’ने हाऊसफुल होत बाजी मारली.

चित्रपटाचा आशय-विषय उत्तम असल्यास प्रेक्षक आवर्जून थिएटरमध्ये जाऊनच चित्रपट बघतात याची प्रचिती ‘चौक’च्या निमित्ताने पुन्हा एकदा आली. चौक चित्रपटाची यशस्वीपणे घौडदौड सुरू आहे. आता चित्रपट चौथ्या आठवड्या प्रेक्षकांचे प्रबोधन करण्यासाठी सज्ज होईल व चौथ्या आठवड्यातही चित्रपटावर हाऊसफुलची पाटी लागेल असा विश्वास चित्रपटाचे निर्माते दिलीपतात्या पाटील यांनी व्यक्त केला.

अधिक वाचा –
– मराठमोळ्या ‘या’ अभिनेत्रीने घातले 108 वेळा सुर्यनमस्कार; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
– पेढे वाटा पेढे! ‘ही’ टीव्ही अभिनेत्री झाली आई, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

हे देखील वाचा