बॉलिवूड अभिनेते सनी देओल (Sunny Deol)हा 90 च्या दशकापासून एक नामवंत कलाकार म्हणून ओळखला जोतो. त्याने 90च्या दशकामध्ये खूप गाजणाऱ्या चित्रपटामध्ये काम केले आहे. आजही तो चाहत्यांचा आवडता कलाकार आहे. सनी देओल सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असल्याने तो खूप चर्चेत असतो. त्याने एका मुलाखतीदरम्यान आपले वडील धर्मेद्र (Dharmendra)यांची प्रशंसा करत त्यांच्यासाठी कौतुक व्यक्त केले आहे. जाणून घेऊया पूर्ण माहिती.
सनी देओलने अभिनय क्षेत्रातून मोठा ब्रेक घेतला होता मात्र, तो पुन्हा एकदा साउथ सुपरस्टार दुलकर सलमान(Dulquer Salmaan) खान सोबत ‘चुप’ या चित्रपटातून पदार्पन करणार आहे. सनी देओलने बऱ्याच मोठ्या चित्रपटामध्ये प्रसिद्ध भुमिका बजावल्या होत्या, ज्या आजही लोकप्रिय आहेत. त्याचे वडील धर्मेद्र हेही आपल्या करिअरमध्ये खूप मोठे अभिनेते होऊन गेले आहेत. त्यांनीही बॉलिवूड गाजवणाऱ्या चित्रपटामध्ये काम केले आहे. आपल्या वडिलांच्या टस्टारडम’ बद्दल बोलताना सनी देओलने सांगितले की, “सगळ्यात मोठे आयडल माझ्या घरातच आहेत आणि मी त्यांचा नेहमीच आभारी राहील.”
वडीलांची प्रशंसा करत सनीने सांगितले की, “माझे वडील एकमात्र अभिनेता आहेत जे सगळ्याच भूमिकेत यशस्वी ठरले आहेत. कोणतीही भुमिका असो ती पूर्णच केली आहे, कधीच कोणत्या भुमिकेसाठी नकार दिला नाही. मग ते ‘सत्यकाम’, असो किंवा ‘चुप चुपके’, ‘शोले’, ‘प्रतिज्ञा’, ‘फूल और पत्थर’, ‘अनुपमा’ यासारख्या अनेक चित्रपटामध्ये त्यांनी आपली भूमिका चांगलीच निभवली आहे. काश! मी त्यांच्या काळात सक्रिय अभिनेता असतो.”
सनीने चालू काळातल्या चित्रपट दिग्गदर्शनावरही वक्तव्य करत सांगितले की, “त्या काळात चित्रपट निर्माण करत असतान लेखक आणि दिग्गदर्शकासोबत भावनिक नाते चांगले असायचे, जे आजच्या पिढीमध्ये दिसत नाही.” चित्रपट उद्योगात आपल्या वडिलांच्या प्रवासाला आठवण करत सनीने सांगितले, “माझे वडील एका दिवसात अनेक चित्रपटांच्या शुटींगला जात होते, एका सेटवरुन दुसऱ्या सेटवर जाण्यासाठी धावपळ करायचे.” यावर त्याला आश्चर्य वाटत आहे की, “त्यावेळचे लेखक आणि दिग्गदर्शक किती चांगले होते एवढी धावपळ होउनही अभिनेता त्यांच्या भूमिका पकडून ठेवायचे.”
सनीने पुढे सांगितले की, “त्या वेळेस लिहिलेल्या स्क्रिप्ट नव्हत्या, फक्त ‘कथा कथनावर’ चित्रपट आधारित असायचे.” त्याने सांगितले की, “आज अभिनेत्याकडे बाउंड स्क्रिप्ट दिल्या असल्या, तरी ते मागेच आहेत, मला असे वाटत आहे की, मी त्या काळात असायला पाहिजे होतो.” सनी देओलच्या ‘चुप’ चित्रपटाचे दिग्गदर्शन आर बाल्की करत आहेत. त्यांचा चुप चित्रपट 26 सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी पूर्णपने तयार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा
गणपती विसर्जनात भोजपुरी गाण्यावर सिद्धांत चतुर्वेदीने केला भन्नाट डान्स, व्हिडिओ एकदा पाहाच
पलक तिवारीच्या पारंपारिक लूकने वेधले लक्ष, आई श्वेता तिवारीने दिली अशी प्रतिक्रिया
मिर्झापूर 2’च्या विजय वर्मासाठी पाकिस्तानातून आली होती लग्नाची ऑफर, जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण