Thursday, March 28, 2024

हिंदी दिनविशेष: ‘इंग्रजी विंग्लिश’ ते ‘नमस्ते लंडन’पर्यंत ‘या’ बॉलिवूड चित्रपटांनी सांगितलं हिंदी भाषेचं महत्त्व

हिंदी चित्रपटसृष्टीने आपल्या चित्रपटांच्या जोरावर जगभरात आपला ठसा उमटवला आहे. अर्थात भाषा वेगळी असू शकते, पण असे असूनही प्रेक्षकांची आवड भारतीय चित्रपटांकडे वाढू लागली आहे. हे हिंदी भाषेचे योगदान आहे की, अनेक चित्रपट मैलाचा दगड ठरले आहेत. पण, अलीकडच्या काळात हिंदीबरोबरच इंग्रजी भाषेचाही चित्रपटांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. पण या चित्रपटांमध्ये बॉलिवूडचे असे काही चित्रपटही बनवले गेले, ज्यांनी हिंदी भाषेचे महत्त्व जगासमोर सांगितले आहे. एक प्रकारे हिंदी चित्रपटांनी संपूर्ण जगाला एकाच धाग्यात बांधले आहे. एवढेच नाही, तर प्रेक्षकांनीही आपल्या भाषेला मिळालेल्या महत्वामुळे हे चित्रपट सुपरहिट होण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. 

बॉलिवूड हिंदी चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना देशातच नव्हे, तर परदेशातही खूप प्रेम मिळाले आहे. अमिताभ बच्चन, ऋतिक रोशन, अक्षय कुमार, आमिर खान, सलमान आणि शाहरुख यांसारख्या बॉलिवूड कलाकारांव्यतिरिक्त, जगात हिंदी चित्रपटांनी अनेक मोठ्या कलाकारांना ओळख मिळवून दिली आहे. जगभरात केवळ हिंदी चित्रपट प्रदर्शित होत नाहीत, तर हजारो लोक चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात पोहोचतात. बॉलिवूड चित्रपटांमुळे हिंदी भाषेने जागतिक मंचावर एक विशेष स्थान निर्माण केले आहे. हिंदीला त्या देशांतही खूप प्रेम मिळाले आहे, जिथे हिंदीचा काही संबंध नाही. हिंदी भाषेला विनोदी, रोमान्स, थ्रिलर, सस्पेन्स आणि ऍक्शन चित्रपटांमध्ये खूप प्रेम मिळाले आहे. अशा बॉलिवूड चित्रपटांविषयी जाणून घेऊया ज्यांनी केवळ स्वदेशीच नाही, तर परदेशी लोकांनाही हिंदीचे धडे दिले आहेत.

हिंदी मिडीयम
साल २०१७ मध्ये आलेल्या ‘हिंदी मिडीयम’ या चित्रपटाने देशातील सर्वात मोठे सत्य मांडले. चित्रपटात दाखवण्यात आले की, कोणत्याही पालकांना आपल्या मुलाला हिंदी माध्यमाच्या शाळेत पाठवायचे नाही आणि त्यांच्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणे किती महत्त्वाचे आहे. या चित्रपटात इरफान खान आणि सबा कमर मुख्य भूमिकेत होते.

इंग्रजी विंग्लिश
साल २०१२ मध्ये आलेल्या ‘इंग्रजी विंग्लिश’ या चित्रपटात प्रत्येक भारतीय स्त्री स्वतःला पाहू शकली. हा चित्रपट शशी नावाच्या महिलेवर आधारित होता, जी इंग्रजी भाषा बोलू शकत नव्हती. ज्यामुळे तिच्याच लोकांनी तिचा आदर केला नाही. या चित्रपटात श्रीदेवींने शशीची भूमिका साकारली होती.

नमस्ते लंडन
‘नमस्ते लंडन’ या चित्रपटाने लोकांमधील हिंदी भाषेला जागृत केले आणि आपल्या देशाबद्दल लोकांमध्ये आदर जागृत करण्यात महत्वाची भूमिका बजावली. या चित्रपटातील डायलॉग इतके व्हायरल झाले होते की, चाहते सहज ते बोलू लागले होते. विशेषतः भारताची सभ्यता समजावून सांगताना अक्षय कुमारच्या डायलॉगला खूप पसंती मिळाली होती. चित्रपटाच्या या डायलॉगची जादू अशी झाली होती की, चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक टाळ्या वाजवताना दिसले. या चित्रपटात अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत होते.

गोलमाल
अमोल पालेकरचा ‘गोलमाल’ हा चित्रपट १९७९ मध्ये आला होता. क्वचितच एखाद्याच्या मनातून हा चित्रपट जाऊ शकतो. हिंदीचे महत्त्व या चित्रपटात अतिशय रंजक पद्धतीने सांगितले आहे. या चित्रपटात अमोल पालेकरसह उत्पल दत्त, ओम प्रकाश, युनुस परवेझ, अमिताभ बच्चन, बिंदिया गोस्वामी आणि दीना पाठक यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.

चुपके चुपके


‘चुपके चुपके’ १९७५ मध्ये आलेला विनोदी चित्रपट हिंदी भाषेभोवती फिरतो. चित्रपटातील धर्मेंद्र यांचे हिंदी भाषेतील संभाषण ऐकल्यावर प्रत्येकजण हसतो. या चित्रपटात धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, शर्मिला टागोर, जया बच्चन आणि ओम प्रकाश सारखे कलाकार मुख्य भूमिकेत होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-विद्युत जामवालने ताजमहालला साक्षी ठेवत गर्लफ्रेंडसोबत कमांडो’ स्टाईलमध्ये केला साखरपुडा

-लॉकडाऊनमध्ये दरदिवशी कंगनावर नोंदवले जायचे २०० हून अधिक एफआयआर, अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा

-अमेरिकन गायिका ब्रिटनी स्पीयर्स पुन्हा एकदा अडकणार लग्नबंधनात, अवघ्या ५५ तासांत तोडले होते पुर्वीचे लग्न

हे देखील वाचा