Tuesday, July 9, 2024

शास्त्रीय नृत्यांगना कनक रेळे यांचे निधन, वयाच्या 85 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सिनेजगतातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ शास्त्रीय नृत्यांगना पद्मभूषण डॉ. कनक रेळे यांचं निधन झालं. त्या 85 वर्षांच्या होत्या हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. कनक रेळे यांनी वयाच्या 85 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टी हळहळली आहे.

मोहिनीअट्टम आणि कथकली या नृत्यप्रकारात त्या पारंगत होत्या. त्यांनी वयाच्या सहाव्या वर्षांपासून कथकली आणि मोहिनीअट्टम या नृत्यप्रकारांचे शिक्षण गुरू पांचाली करुणाकर पणीकर यांच्याकडून घेतले. मोहिनीअट्ट्म नृत्यप्रकाराची विशेष तालीम त्यांना कलामंडलम्‌ राजलक्ष्मी यांच्याकडून मिळाली. डॉ. कनक रेळे गेली अनेक वर्षे नृत्यशिक्षणाचे काम करीत आहेत. त्यासाठी त्यांनी मुंबईत इ.स. 1966 साली ’नालंदा डान्स ॲन्ड रिसर्च सेंटर’ आणि ’नालंदा नृत्यकला महाविद्यालय’ या संस्था स्थापन केल्या. गरीब घरातल्या नृत्यप्रेमी मुलींसाठी नृत्य शिकण्याची संधी मिळावी यासाठी त्यांनी या संस्थांचं शुल्कही कमी ठेवलं होत.

डॉ.कनक रेळे वयाचा सातव्या वर्षापासून गुरुकुल पांचाली करुणाकर पणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कथकली शिकत होत्या. त्यानंतर अनेक वर्षांनी कनक रेळे यांनी कलामंडलम राजलक्ष्मी यांच्याकडून मोहिनीअट्टममची दीक्षा घेतली. संगीत नाटक अकादमी आणि नंतर फोर्ड फाऊंडेशनच्या अनुदानाने आपल्या आवडीच्या मोहिनीअट्टमम या विषयाचा त्यांनी अधिक सखोल अभ्यास केला.1970-1971 च्या काळात त्यांनी कुंजुकुट्टी अम्मा, चिन्नम्मू अम्मा आणि कल्याणीकुट्टी अम्मा यासारख्या केरळीय चित्रकला निपुणांचे दर्शन घेतले. या प्रोजेक्टने त्यांना मोहिनीअट्टमची माहिती गोळा करण्यास मदत केली. कनक रेळे यांनी त्याच्या पारंपरिक व तांत्रिक शैलीचे रेकॉर्डिंग केले. या रेकाॅर्डिंगचा त्यांना नृुत्य शिक्षण पद्धती विकसित करण्यास उपयोग झाला नृुत्य शिक्षण पद्धती विकसित करण्यास उपयोग झाला. कनक रेळे यांना पद्मभूषण, कालिदास सन्मान, संगीत नाटक अकादमी अवॉर्ड, अशा अनेक पुरस्कारांनी आजवर सन्मानित करण्यात आलं आहे.

 

अभिनेत्री हेमा मालिनी यांनी त्यांच्या सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘आपल्या सर्वांसाठी, विशेषत: माझ्यासाठी एक दुःखद दिवस आणि खूप मोठे नुकसान. आमच्यात प्रेम आणि परस्पर आदर होता. पद्मविभूषण डॉ. श्रीमती. कनक रेले, मोहिनी अट्टम नृत्यांगना, नृत्यदिग्दर्शक आणि नालंदा नृत्य संशोधन केंद्राचे संस्थापक यांचे निधन म्हणजे शास्त्रीय नृत्याच्या जगासाठी एका महान युगाचा अंत झाला. या जगासाठी त्यांचे योगदान मोठे आहे. कनकजींचे सौंदर्य आणि व्यक्तिमत्व चिरंतन राहिल. त्यांच्या विस्मयकारक कुटुंबास आणि नालंदामधील सदस्यांप्रती माझे मनःपूर्वक संवेदना.
आमची मैत्री नेहमी जपली जाईल..’ (classical-dancer-kanak-rele-pass-away-cause-of-heart-attack)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीने सोशल मीडियाला अचानक ठोकला रामराम, पोस्ट शेअर करत दिली माहिती
अत्यंत वादग्रस्त : ‘स्वरा भास्कर जर हजारो पुरुषांसोबत रात्र घालवणार…’, अयोद्धेतील महंताच्या विधानाने खळबळ

हे देखील वाचा