Tuesday, May 21, 2024

जरा इकडे पाहा! कपिलचा शो सोडल्यानंतर सुनील ग्रोव्हर रस्त्याच्या कडेला विकतोय शेंगदाणे

कॉमेडियन सुनील सिंग ग्रोव्हर याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सुनील ग्रोव्हर रस्त्याच्या कडेला शेंगदाणे भाजताना दिसत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुनील ग्रोव्हरने स्वतः हा व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. कॉमेडियनचा हा व्हिडिओ समोर आल्यापासून त्याचे चाहते नाराज झाले आहेत. असे काय झाले की, एवढ्या मोठ्या कॉमेडियनला शेंगदाणे विकावे लागत आहे. असा एकच प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण होत आहे.

नेटकऱ्यांनी सुनील ग्राेव्हरची उडवली खिल्ली
काॅमेडियन सुनील ग्राेव्हर (Sunil Grover) याचे चाहते त्याच्या व्हिडिओवर कमेंट करत त्याला विविध प्रश्न विचारत आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिले, “भाऊ, पत्ता द्या, आम्हीही येतो.” तर, दुसर्‍या युजरने कमेंट करत लिहिले, “कसे आले दिवस.” एका युजरने कॉमेडीयनची खिल्ली उडवत ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) सोडल्यानंतर तू असा झाला आहेस’ अशी कमेंट केली. त्याचबरोबर काही चाहत्यांना कलाकाराचा हा व्हिडीओ पाहून चांगलाच धक्का बसला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunil Grover (@whosunilgrover)

सुनीलने चाहत्यांचे मनाेरंजन करण्यासाठी शेअर केला व्हिडिओ?
कॉमेडियन सुनील ग्रोव्हर अनेकदा व्हिडिओ शेअर करून त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करत असताे. त्‍याने त्‍याच्‍या चाहत्‍यांचे मनोरंजन करण्‍यासाठी हा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. यामध्ये विनोदी कलाकार शेंगदाणे विक्रेत्याच्या दुकानात बसून शेंगदाणे भाजताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पोस्ट करत सुनीलने ‘खाओ खाओ खाओ’ असे लिहिले आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (comedian actor sunil grover selling peanuts on roadside after leaving the kapil sharma show videos goes viral)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
धक्कादायक! लग्न 5 दिवसांवर आलं असताना नागा शौर्याची प्रकृती बिघडली

काजोलच्या ‘सलाम वेंकी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

हे देखील वाचा