Monday, May 27, 2024

काजोलच्या ‘सलाम वेंकी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

बॉलिवूड अभिनेत्री काजोल (Kajol) फिल्मी करिअरची दुसरी इनिंग सुरू करणार आहे. काजोल बऱ्याच दिवसांनी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. काजोलच्या ‘सलाम वेंकी’ (Salaam Venky) या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे या ट्रेलरमध्ये काजोलसोबत बॉलिवूडचा एक सुपरस्टारही दिसत आहे. ‘सलाम वेंकी’ च्या ट्रेलरमधील डायलॉग्सनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री काजोल बऱ्याच काळानंतर मोठ्यावर झळकणार आहे. काजोलच्या ‘सलाम वेंकी’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ‘सलाम वेंकी’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आई आणि मुलाच्या जोडीची बाँडिंग दिसत आहे. चित्रपटात आई आणि मुलाचे नाते उत्तम पद्धतीने दाखवण्यात आले आहे. एक आजारी मुलगा ज्याला वाचवण्यासाठी आई शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार करते अशी सिनेमाची वनलाईन आहे. सलाम वेंकीच्या ट्रेलरच्या शेवटी एक मोठे सरप्राईज देखील आहे. या सिनेमात काजोलसोबत बॉलिवूडचा सुपरस्टार दिसणार आहे. ही आई आणि मुलाची जोडी ट्रेलरमध्ये अभिनेते राजेश खन्ना यांचा ‘जिंदगी लम्बी नहीं बड़ी होनी चाहिए बाबू मोशाय’ हा डायलॉग म्हणताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

ट्रेलरमध्ये दिसत आहे की सुजाता ही तिच्या मुलाची म्हणजेच व्यंकटेशची काळजी घेत असते. व्यंकटेश हा एका आजाराचा सामना करत असतो, असं ट्रेलरमध्ये दिसत आहे. सुजाता ही भूमिका काजोलनं साकारली आहे तर व्यंकटेश ही भूमिका अभिनेता विशाल जेठवानं साकारली आहे. या चित्रपटामध्ये आमिर खाननं देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

कधी रिलीज होणार सलाम वेंकी?
सलमान वेंकी हा चित्रपट 9 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. काजोलसोबतच विशाल जेठवा  (Vishal Jethwa), राजीव खंडेलवाल, प्रकाश राज आणि अहना कुमरा यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिनेत्री रेवती यांनी केलं आहे. काजोलनं या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. हे पोस्टर शेअर करत काजोलनं कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘सलाम वेंकीचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट सिनेमागृहामध्ये 9 डिसेंबरला रिलीज होत आहे’. काजोलच्या या पोस्टला अनेक सेलिब्रिटींनी तसेच नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. काही युझर्सने काजोलच्या पोस्टला कमेंट करुन काजोलला शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रियांकाचा नवरा निक जोनस ‘या’ गंभीर आजाराने आहे ग्रस्त; व्हिडिओ पोस्ट करत दिली माहिती

कपिलने अजय देवगणला त्याच्या लग्नाशी संबंधित विचारला प्रश्न, अभिनेत्याने दिले मजेशीर उत्तर

हे देखील वाचा