सध्या सर्वांचे लक्ष एका कलाकाराकडे लागले आहे, ते म्हणजे स्टार कॉमेडियन राजू श्रीवास्तव होय. राजू मागील एका आठवड्यापेक्षा जास्त दिवस रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. त्याच्या तब्येतीत सुधारणा झाल्याचे सांगितले जात आहे. त्याची पत्नी शिखा आणि त्याचा मॅनेजर मकबूल याने राजूची तब्येत सुधारत असल्याचे म्हटले आहे. देशभरात राजूचे चाहते त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. अशात ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’मध्ये राजूचा सहकलाकार राहिलेला कॉमेडियन एहसान कुरेशी याने सांगितले आहे की, राजूचे अनेक मित्र त्याच्यासाठी हनुमान चालीसाचे पठण करत आहेत.
‘आता चमत्कारच वाचवू शकतो’
माध्यमांशी बोलताना एहसान कुरेशी (Ahsaan Qureshi) याने सांगितले की, “डॉक्टरांनी हार मानली आहे. राजूला वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले आहेत आणि आता केवळ चमत्कारच त्याला वाचवू शकतो, असे त्यांनी कुटुंबीयांना सांगितले आहे. त्याच्या मृत्यूच्या बातम्या खोट्या आहेत. त्याचा ब्रेन डेड झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे. आम्ही सर्व मित्र त्याच्यासाठी प्रार्थना करत आहोत आणि काहीवेळापूर्वीच आम्ही हनुमान चालीसाचे पठण करत होतो.”
शेवटची कधी झाली होती भेट?
माध्यमांतील वृत्तांनुसार, एहसान कुरेशीने सांगितले की, “मी त्याला शेवटचा ओशिवारा पोलीस स्टेशनजवळ भेटलो होतो. मेरीगोल्ड बिल्डिंगमध्ये त्याचे ऑफिस आहे. तो जेव्हाही लखनऊला यायचा, तेव्हा तो मित्रांसोबत कॉफी प्यायचा. मी आणि सुनील पाल जेव्हाही त्याला भेटायचो, तेव्हा चित्रपटांच्या अनुदानासाठी अर्ज करण्याबाबत आम्ही त्याच्याशी बोलायचो.”
View this post on Instagram
राजूला भेटण्यासाठी जाणार एहसान कुरेशी
एहसान कुरेशी याने सांगितले की, राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) याची मुलगी अंतराचे लग्न व्हायचे आहे आणि त्याचा मुलगा खूपच तरुण आहे. आम्ही त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहोत. आम्हा सर्वांना त्याची काळजी आहे. सायंकाळपर्यंत आम्ही दिल्लीत पोहोचणार आहोत. आमची इच्छा आहे की, राजू लवकर बरा झाला पाहिजे.”
खरं तर, राजू श्रीवास्तव याच्या पत्नीने अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पवन सिंग अन् आम्रपाली दुबेचे सर्वात बोल्ड गाणे व्हायरल, एक-दोन नाही, तर मिळालेत ‘एवढे’ कोटी हिट्स
आनंदाची बातमी! ‘साथ निभाना साथिया’मधील ‘ही’ अभिनेत्री दुसऱ्यांदा आई बनणार, हटके अंदाजात केली घोषणा
‘लाल सिंग चड्ढा’च्या बॉयकॉटवर स्पष्टच बोलला विजय; म्हणाला, ‘फक्त आमिरच नाही, तर हजारो कुटुंब…’