रोहित शेट्टीला पाहताच आनंदाने गळ्यात पडून भारती सिंगने केले किस, पतीच्याही उंचावल्या भुवया


आगामी चित्रपट असो किंवा शो, यातील कलाकार नेहमीच प्रमोशन करत असतात. असेच आता चित्रपट निर्माता रोहित शेट्टीही आपल्या ‘खतरों के खिलाडी ११’ शोच्या प्रमोशनसाठी या वीकेंडला डान्स रियॅलिटी शो ‘डान्स दीवाने ३’मध्ये हजेरी लावणार आहे. यादरम्यान शोची होस्ट आणि कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया रोहितचे जबरदस्त स्वागत करताना दिसणार आहेत. रोहितच्या येण्यामुळे भारतीचा आनंद गगनात मावेनासा होतो. जोरात किंचाळून ती त्याच्या गळ्यात फुलांची माळही टाकते आणि त्यानंतर जे काही करते, ते पाहून तिचा पती हर्षच्याही भुवया उंचावतात.

कॉमेडियन भारतीने नुकतेच अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शोच्या प्रोमोचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की, रोहित शेट्टीने शोमध्ये हजेरी लावल्यामुळे भारती किती खुश झाली आहे. मात्र, भारतीने रोहित शेट्टीसोबत जे कृत्य केले, ते पाहून तिचा पती हर्ष बिल्कुल खुश नसल्याचे दिसत आहे. (Comedian Bharti Singh Showers Kisses And Puts Garland On Rohit Shetty Her Husband Remind Her Social Distancing)

भारतीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, रोहितच्या येण्याची घोषणा करत भारती जोरजोरात किंचाळते. रोहित जसा स्टेजवर येतो, तेव्हा भारत सर्वप्रथम त्याला फुलांची माळ घालते. यानंतर त्याची गळाभेट घेऊन गालावर किस करते. हे सर्व पाहून भारतीचा पती हर्ष मात्र खुश नसल्याचे दिसते. तो पाठीमागे उभा राहून पाहताना कमेंट करतो की, “सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा.” हर्ष रोहितला म्हणतो की, “लग्नानंतर आमचे सोशल डिस्टन्सिंग सुरू आहे.” हे ऐकून रोहित म्हणतो की, “त्यामुळेच हे हाल आहे.”

भारतीचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. तिच्या या व्हिडिओला आतापर्यंत दीड लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच चाहत्यांकडूनही व्हिडिओवर कमेंट्समार्फत भरभरून प्रेम मिळत आहे.

भारतीने मागील वर्षी ‘खतरों के खिलाडी’ शोमध्ये भाग घेतला होता. ती नेहमीच रोहित शेट्टीसोबत फ्लर्ट करत असते.

भारतीने आतापर्यंत ‘कॉमेडी सर्कस’, ‘द कपिल शर्मा शो’ यांसारख्या अनेक शोमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-करीना आणि सैफच्या दुसऱ्या मुलाचे नाव झाले फायनल; आजोबा रणधीर कपूर यांनी दिली माहिती

-जोहरा सेहगल यांना बिग बी म्हणाले होते, ‘१०० वर्षांची मुलगी’; तर मजेदार होती त्यांची शेवटची ईच्छा

-संस्कृती बालगुडेने घोड्यासोबत केलं फोटोशूट; हटके फोटोंना मिळतोय चाहत्यांचा प्रतिसाद


Leave A Reply

Your email address will not be published.