Tuesday, October 14, 2025
Home बॉलीवूड जेमी लिव्हरने केली राखी सावंतची ‘अशी’ नक्कल, व्हिडिओ पाहून खुद्द ‘ड्रामा क्वीन’ही झाली लोटपोट

जेमी लिव्हरने केली राखी सावंतची ‘अशी’ नक्कल, व्हिडिओ पाहून खुद्द ‘ड्रामा क्वीन’ही झाली लोटपोट

बॉलिवूडचे प्रसिद्ध कॉमेडियन जॉनी लिव्हर यांची मुलगी जेमी लिव्हर देखील तिच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत य़शाच्या पायऱ्या चढत आहे. जेमी आज आपल्या प्रतिभेच्या जोरावर चांगली ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे. जॉनी ज्याप्रकारे अनेक बॉलिवूड कलाकारांची नक्कल करत असे, आता जेमी देखील बॉलिवूड अभिनेत्रींची नक्कल करताना दिसत आहे. मोठ्या पडद्यावर नाही, पण छोट्या पडद्यावर जेमीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जेमी (Jemie Lever) सतत कोणत्या ना कोणत्या टीव्ही शोमध्ये दिसते आणि प्रेक्षकांनाही तिचा अभिनय आवडतो. जेमी सोशल नेटवर्किंग साईट इंस्टाग्रामवर देखील खूप सक्रिय आहे आणि तिचे कॉमेडी व्हिडिओ येथे शेअर करून ती प्रेक्षकांची मने जिंकत आहे. जेमीला इंस्टाग्रामवर ८ लाखांहून अधिक चाहते फॉलो करतात. म्हणजेच टीव्हीसोबतच सोशल मीडियावरही जेमीचे चांगले फॅन फॉलोविंग आहे.

सध्या जेमीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो या वर्षीच्या ऑगस्टचा आहे. बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत (Rakhi Sawant) हिचे एक गाणे प्रदर्शित झाले, तेव्हा जेमीने हा व्हिडिओ बनवला होता, ज्याचे नाव ‘तेरे दिल में मेरी एन्ट्री’ होते. त्यादरम्यान राखी तिच्या गाण्याचे जोरदार प्रमोशन करत होती आणि राखीच्या त्याच स्टाईलला अनुसरून जेमीने तिचा हा व्हिडिओ बनवला, ज्यामध्ये तिने राखीची जबरदस्त नक्कल केली.

यापूर्वीही केली आहे अनेक अभिनेत्रींची नक्कल
हा व्हिडिओ पाहून राखीला स्वतःला थांबवता आले नाही आणि तिने व्हिडिओवरच हसणाऱ्या इमोजीचा वर्षाव केला. ज्यावरून स्पष्टपणे दिसून येते की, राखीलाही जेमीचा हा व्हिडिओ खूप आवडला आहे. राखीसोबतच जेमीच्या या व्हिडिओला चाहते देखील खूप पसंत करत आहेत. जेमीचे चाहते सतत या व्हिडिओवर कमेंट करत आहेत आणि तिच्या कलेचे कौतुक करत आहेत. आतापर्यंत या व्हिडिओला ७ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. याआधीही जेमीने अनेक बॉलिवूड अभिनेत्रींची नक्कल केली आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा