Wednesday, June 26, 2024

कपिल शर्माला कॉमेडियन नव्हे, तर बनायचे होते डाकू, ‘हा’ चित्रपट पाहून मनात आली होती कल्पना

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर त्याने इंडस्ट्रीत हे स्थान मिळवले आहे. मोठमोठे सेलेब्स देखील स्वतःला त्याचे चाहते म्हणवतात. मात्र, इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला. कपिल शर्मा त्याच्या कॉमिक टायमिंगने सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणतो. तो शोमधील पाहुण्यांना खळखळून हसवतो. कपिल अनेकदा सेलिब्रिटींच्या फीवर बोलतो. ज्यामुळे त्याच्या टीमचे सदस्य शोमध्ये त्याच्या पगारासाठी पाय खेचत राहतात. अलीकडेच या शोमध्ये साजिद नाडियादवालाचा एक खास एपिसोड होता. ज्यामध्ये साजिद नाडियादवाला, अहान शेट्टी, टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि क्रिती सेनन (Kriti Sanon) खास पाहुणे म्हणून आले होते. या एपिसोडमध्ये कपिलने खुलासा केला होता की, त्याला कॉमेडियन नव्हे, तर डाकू बनायचे होते. कपिलला ‘शोले’ पाहिल्यानंतर डाकू बनण्याची कल्पना आली.

कपिल शर्माने पाहुण्यांना किस्सा सांगताना सांगितले की, “लहानपणी कधी कधी आपण वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करतो जसे की, मी शोले चित्रपट पाहिला होता आणि मला वाटले होते की मी मोठा होऊन डाकू होईन.” कपिलचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर अर्चना पूरण सिंगने (Archana Puran Singh) लगेच उत्तर दिले. “तू डाकूच झाला आहेस, सोनीला लुटतोस, तू लुटारू आहेस,” असे अर्चना म्हणते.

अर्चना पूरण सिंगच्या चर्चेला उत्तर देताना कपिल म्हणाला की, “मी फक्त सोनीला लुटतोय? तुम्ही तर दुपारच्या जेवणावर येता.” कपिल आणि अर्चना पूरण सिंगचे बोलणे ऐकून सगळे हसायला लागतात.

या एपिसोडमध्ये टायगर श्रॉफने त्याच्या रिलेशनशिप स्टेटसचा खुलासा केला. कपिलने साजिदची पत्नी वर्धाशी लग्नाबद्दल बोलला. त्यावर ती टायगरला म्हणते की, यावर तुझे काय म्हणणे आहे. त्यावर टायगर म्हणतो की, “काय सांगू मी सिंगल आहे.” यानंतर तो म्हणतो की, “सध्या लग्नाचा कोणताही विचार नाही.”

कपिल शर्मा शोचा या आठवड्याचा एपिसोड धमाकेदार असणार आहे. भोजपुरी इंडस्ट्रीतील कलाकार रवी किशन, निरहुआ, आम्रपाली दुबे आणि राणी चॅटर्जी या शोमध्ये दिसणार आहेत.

यापूर्वी कपिल शर्माने सांगितले होते की, अर्चना पूरण सिंगनेही त्याला स्टार बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जेव्हा कपिल शर्माने कॉमेडी शोमधून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि तो स्पर्धकामध्येही सामील होता. तेव्हा अर्चना पूरण सिंगने त्याला नेहमीच प्रोत्साहन दिले. कपिल पुढे म्हणाला होता की, कलाकाराला यापेक्षा आणखी काय हवे असते की, कोणीतरी तुम्हाला सर्वोत्कृष्ट होण्यासाठी प्रोत्साहित करत असेल. अर्चना पूरण सिंग आणि कपिल शर्मा खूप चांगले मित्र आहेत आणि दोघेही शोमध्ये एकमेकांना ओढताना दिसत आहेत. त्यामुळे शोमध्ये उपस्थित प्रेक्षकांपासून ते चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलेल्या स्टार्सनाही हसायला भाग पाडले जाते.

हेही वाचा :

हे देखील वाचा