हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कॉमेडियन राजपाल यादव चित्रपटांसोबतच सोशल मीडियावरही चाहत्यांचे भरपूर मनोरंजन करत असतो. विनोदी किंवा भावनिक सीन करून राजपालने अनेक चित्रपटांमध्ये रंगत आणली आहे. त्याने आपल्या कारकीर्दीत एकापेक्षा एक सुपरहीट चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. हा अभिनेता सोशल मीडियावर देखील आपल्या चाहत्यांना हसवण्यात कोणतीही कसर सोडत नाही. अनेकदा सोशल मीडियावर राजपालचे मजेदार व्हिडिओही पाहायला मिळतात. आता तो त्याच्या फिटनेसमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. त्याचे फिटनेसबाबतचे वर्कआउट पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल आणि तुम्ही तुमचे हसू थांबवू शकणार नाही.
राजपाल यादव (Rajpal Yadav) सध्या त्याच्या फिटनेसबाबत सिरियस आहे. पण आता राजपाल यादव आहे, त्यामुळे वर्कआऊटच्या वेळीही काही कॉमेडीचा शिडकावा होणे स्वाभाविक आहे. असेच काहीसे त्याच्या लेटेस्ट व्हिडिओंमध्येही पाहायला मिळत आहे. राजपाल यादवने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो पुलअप्स करत आहे.
राजपाल यादव जिम व्हिडिओ
राजपाल यादव म्हणत आहे की, “मी किती करत आहे ते मोजा.” एक केल्यावरच तो थांबतो. मागून आवाज येतो तू पूर्ण कर. यावर तो एकच सेट पुरेसा असल्याचे सांगत जोरात हसतो. अशातच राजपाल यादवची फनी स्टाईल जिममध्येही पाहायला मिळते. त्याचा हा जोक चाहत्यांना खूप आवडला आहे. एका चाहत्याने लिहिले आहे की, “हे हसणं पाहून मला ढोल चित्रपटाची आठवण झाली.” तर दुसऱ्या एका चाहत्याने “एकाच याने बॉडी बनेल आपल्या भाईची” अशी कमेंट केली आहे.
राजपाल यादवची कारकीर्द
राजपाल यादवने आपल्या करिअरमध्ये अनेक कॉमेडी चित्रपट केले आहेत. मात्र, त्याच्या करिअरची सुरुवात दूरदर्शनच्या ‘मुंगेरी के भाई नौरंगीलाल’ या मालिकेने झाली. त्याची कॉमिक टायमिंग चांगलीच आवडली होती. ‘चुप चुप के’ चित्रपटातून त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्याच्या लोकप्रिय चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर ‘हंगामा’, ‘भूलभुलैया’, ‘किक २’, ‘हेरा फेरी’ आणि ‘ढोल’ हे आहेत. ‘अर्ध’ हा त्याचा आगामी चित्रपट आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
- हेही वाचा –
- Spruha Joshi | ‘अनुनाद’ आणि ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ पुस्तकांबद्दल स्पृहाचा विशेष Video, सांगितल्या खास गोष्टी
- भारतीय सिनेमातील पहिल्या अभिनेत्री बनलेल्या देविका राणी यांनी दिला होता मूवी माफियांविरोधात लढा
- सुंदरता ही ओळख असणारी ‘ही’ दिग्गज अभिनेत्री आजार लपवण्यासाठी घ्यायची हेव्ही मेकअपचा आधार