Saturday, April 20, 2024

बॉलिवूडने दमदार अभिनेत्री गमावली! डायरेक्टरच्या घाणेरड्या मागणीमुळे ‘या’ ऍक्ट्रेसने घेतला मोठा निर्णय

रुपेरी पडद्यावर काम करण्यासाठी प्रत्येकजण जीवाची बाजी लावत असतो. एकदा का मोठ्या पडद्यावर झळकलो की, आपली प्रसिद्धी गगनाला भिडेल, असं प्रत्येकाला वाटत असतं. मात्र, काही व्यक्ती असे असतात, जे छोट्या पडद्यावर काम करूनही देशाच्या कानाकोपऱ्यातील घराघरात पोहोचतात. विशेष म्हणजे, त्यांना रुपेरी पडद्यावर झळकण्याची इच्छा देखील होत नाही. अशीच एक अभिनेत्री आहे सायंतनी घोष. सायंतनी अनेक वर्षांपासून छोटा पडदा गाजवत आहे. अशात तिने नुकत्याच एका मुलाखतीत धक्कादायक निर्णय घेतला आहे. यासोबतच तिने कास्टिंग काऊच याबद्दलही खुलासा केला आहे.

‘छोट्या पडद्यावर काम करण्याचा अभिमान’
अभिनेत्री सायंतनी घोष (Sayantani Ghosh) हिने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तिने ओटीटी आणि टीव्हीवरील कंटेंटबद्दल चर्चा केली. तिने सांगितले की, “टेलिव्हिजन हे माध्यम आधीही आणि आताही जबरदस्त आहे. कारण, आजही घराघरात तुम्हाला टीव्ही पाहायला मिळतो. ओटीटीचाही आपला वेगळा प्रेक्षकवर्ग आहे. मात्र, सर्वाधिक प्रेक्षकवर्ग टीव्हीकडेच आहे. आजही सिनेमांचे प्रमोशन करण्यासाठी टेलिव्हिजनवर येतात. कारण, टेलिव्हिजन हे भरमसाठ लोकांपर्यंत पोहोचते. यामुळे थोड्याफार गोष्टी प्रभावित होऊ शकतात, पण सकारात्मकही आहेच. मी नेहमीच म्हणते की, छोट्या पडद्यावर काम करण्याचा मला अभिमान वाटतो. मला वाटते की, कहाणी चांगल्याप्रकारे सांगितली, तर प्रेक्षक नेहमीच आपल्यासोबत राहतील.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sayantani (@sayantanighosh0609)

कास्टिंग काऊचबद्दल मोठे वक्तव्य
सायंतनीने कास्टिंग काऊच (Sayantani On Casting Couch) याबद्दल बोलताना म्हटले की, “मी टीव्हीमध्येनाव काम करत आहे, आणि टीव्हीचे खूप स्पष्ट आहे. मात्र, एकदा सिनेमाच्या निर्मात्याने मला त्यांच्या ऑफिसात बोलवले होते. ती एकच घटना राहिलीये. त्यावेळी पोर्टफोलिओ असायचे. मी माझा पोर्टफोलिओ घेऊन गेली होती. त्यांनी माझे मॉक शूटही केले. त्यानंतर त्यांनी वाईट हेतूने म्हटले की, ‘हे पाहा, पोर्टफोलिओ पाहून घेऊ. मात्र, थोडा वेळ घालवून एकमेकांना चांगल्याप्रकारे जाणून घेऊया.’ त्यांनी असे म्हटले, परंतु मला त्या मार्गावर कधीच जायचे नव्हते. त्यामुळे सिनेमाला नकार कळवला. ते सोडून मला पुन्हा अशा गोष्टींचा सामना करावा लागला नाही. मला अनेक भूमिका मिळत राहतात, पण मी टीव्हीच्या दुनियेत खूप खुश आहे. त्यामुळे मी टीव्ही बंद करून दुसरं काहीही करणार नाहीये.” हे वृत्त दैनिक भास्कर या वृत्तसंस्थेने दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sayantani (@sayantanighosh0609)

सायंतनीच्या मालिका
सायंतनीच्या मालिकांबद्दल बोलायचं झालं, तर ती ‘घर एक सपना’, ‘नागिन’, ‘मेरी माँ’, ‘महाभारत’, ‘सिंहासन बत्तीसी’, ‘नामकरण’, ‘कर्णसंगिनी’ आणि ‘संजीवनी’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये झळकली आहे. सध्या ती ‘अली बाबा: दास्तान-ए-काबूल’मध्ये ‘सिम-सिम’ची भूमिका साकारत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
हुमा कुरेशीने कपिल शर्मासाठी गायले ‘हे’ गाणे; हसून हसून प्रेक्षकही झाले लोटपोट
बापरे बाप! लोकप्रिय गायकाने सेल्फी काढायला आलेल्या चाहतीलाच केले किस, व्हिडिओ तुफान व्हायरल
अर्रर्र! तेजस्वी प्रकाश अन् करण कुंद्राचे झाले ब्रेकअप? व्हायरल पोस्टनंतर चाहत्यांनी दर्शवली नाराज

हे देखील वाचा