जेनेलियासोबत रितेश करत होता रोमान्स; तिचा हात समजून केले ‘या’ दिग्दर्शकाच्या हातावर किस, पुढं काय झालं पाहाच…


बॉलिवूडमधील अत्यंत रोमँटिक आणि क्यूट जोडी म्हणजे रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख. या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. त्यांनी चित्रपटात जेवढे रोमँटिक आहेत, तेवढेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात देखील ते रोमँटिक आहेत. त्यांचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जेनेलियाचे लग्न झाल्यानंतर ती जास्त चित्रपटात दिसली नाही. ती तिचा संपूर्ण वेळ तिच्या मुलांसोबत घालवते. रितेश त्याच्या प्रेमाचा खुलासा करण्याची एकही संधी सोडत नाही. तो नेहमीच जेनेलियावर त्याच्या प्रेमाचा वर्षाव करत असतो. याचे दर्शन त्यांच्या सोशल मीडियावरील व्हिडिओमधून सर्वांना मिळत असते. अशाच या क्यूट जोडीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे.

रितेश देशमुखने त्याची पत्नी जेनेलिया देशमुखसोबत एक मजेशीर व्हिडिओ त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ते दोघेही एका सोफ्यावर बसलेले असतात. दोघेही एकमेकांना प्रेमात बुडालेले दिसत आहेत. तिथेच त्या सोफ्याच्या मागे एक दिग्दर्शक लपून बसलेला असतो. हा दिग्दर्शक इतर कोणी नसून मिलाप झवेरी असतो. त्यावेळी त्याने त्याचा हात रितेशच्या खांद्यावर टाकलेला असतो. रितेशला असे वाटते की, तो हात जेनेलियाचा आहे. तो त्याच्या हाताला किसही करतो. तितक्यात जेनेलिया तिथून उठून जाते, तेव्हा त्याला समजते की, तो हात तिचा नव्हता. रितेशला‌ जेव्हा समजते की, तो हात दिग्दर्शकाचा आहे तो खूप हैराण होतो. तो तिथून पळण्याचा प्रयत्न करतो. पण तो तिथून जाऊ शकत नाही.

रितेश आणि जेनेलियाचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओला 40 लाखांपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. त्यांचे चाहते या व्हिडिओवर खूप प्रतिक्रिया देत आहेत. सगळेजण या व्हिडिओला एन्जॉय करत आहेत.

रितेश देशमुखच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तो लवकरच ‘बच्चन पांडे’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या आधी तो ‘बाघी 3’ मध्ये दिसला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कियारा आडवाणीचा बिकिनीतील व्हिडिओ घालतोय सोशल मीडियावर धुमाकूळ, करतेय ‘या’ गोष्टीला मिस

-आहा कडकच ना! ‘लुट गए’ गाण्यावर पोरीचा जबरदस्त डान्स, मिळाले १ कोटीपेक्षाही अधिक व्ह्यूज

-नादच खुळा! यूट्यूबर शिरुश्रीने केला धमाकेदार ‘शिव तांडव’ डान्स; पाहून तुमचेही थिरकतील पाय


Leave A Reply

Your email address will not be published.