Tuesday, June 25, 2024

कोरोनाने पुन्हा पसरले बॉलिवूडमध्ये आपले पाय! काजोलची बहीण तनिषा आढळली ‘कोव्हिड पॉझिटिव्ह’

कोरोना व्हायरसने देशभरातच नाही, तर जगभरात गेली २ वर्षे अक्षरशः कहर केला होता. या व्हायरसमुळे सर्व क्षेत्रांना मोठा फटका बसला. तर सध्या या महामारीतून देश बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे. अशातच जनजीवन पुन्हा रुळावर येऊ लागले असतानाच, बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. होय, आता अभिनेत्री तनिषा मुखर्जी कोरोनाच्या तावडीत सापडली आहे.

तनिषाने सोशल मीडियावर दिली माहिती
अभिनेत्री काजोलची बहीण तनिषा मुखर्जीने नुकतीच इंस्टाग्रामवर माहिती दिली की, ती कोव्हिड पॉझिटिव्ह झाली आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले आहे की, “सर्वांना नमस्कार, मी कोव्हिड पॉझिटिव्ह आढळले आहे आणि गरजेनुसार मी विलगीकरणात राहील.” तनिषाची ही स्टोरी पाहून तिचे चाहते चिंता व्यक्त करत आहेत, तसेच ते तनिषाला लवकरात लवकर बरी होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत. (corona becomes active again in bollywood kajols sister tanisha turns covid positive)

अलिकडेच अभिनेता कमल हासनही कोव्हिड पॉझिटिव्ह आढळले आहे. कमल सध्या हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. तर चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत.

‘बिग बॉस’चा राहिलीय भाग
तनिषाला अभिनयात आपला ठसा उमटवता आला नाही, पण भारतातील सर्वात लोकप्रिय रियॅलिटी शो ‘बिग बॉस ७’ मध्ये ती अभिनेता अरमान कोहलीला डेट केल्यामुळे खूप चर्चेत होती. दोघांच्या लव्ह सीक्वेन्सने या शोला खूप टीआरपी दिला. मात्र असे असले, तरी तिची बहीण काजोल आणि अजय देवगणने या नात्यावर आक्षेप घेतला होता. अशा परिस्थितीत शोमधून बाहेर आल्यानंतर तनिषाचे अरमानसोबत ब्रेकअप झाले. ज्याचे कारण अरमानचा राग आणि भांडण असल्याचे सांगण्यात आले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी या चित्रपटासाठी आपले रक्त दिलंय’, म्हणत शाहिदने सांगितला ‘जर्सी’ चित्रपटादरम्यानचा वाईट किस्सा

-नेपोटिझमबाबत आयुष शर्माने मांडले मत; सलमान, शाहरुखचा उल्लेख करत म्हणाला, ‘प्रत्येक अभिनेता स्वार्थी…’

-काय सांगता! जॅकलिन फर्नांडिस आहे २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपीसोबत रिलेशनशिपमध्ये?

हे देखील वाचा