Friday, April 18, 2025
Home बॉलीवूड जॅकलिनला मोठा दिलासा! 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अंतरिम जामीन वाढवला

जॅकलिनला मोठा दिलासा! 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अंतरिम जामीन वाढवला

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस(jacqueline fernandez) हिला दिल्ली कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. पटियाला हाऊस कोर्टाने 22 नोव्हेंबर रोजी जामीन याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय दिला आहे. ठग सुकेश चंद्रशेखर याच्या 200 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात सध्या सुरू असलेल्या ईडीच्या तपासात जॅकलीन ही आरोपी आहे. सध्या या प्रकरणात जॅकलिनला दिलासा मिळाला असला तरी तिचे पूर्ण टेंशन संपलेले नाही.

गेल्या काही दिवसांपूर्वीच दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तब्बल 15 तास जॅकलिनची चौकशी केली होती. कोर्टाने ईडीला विचारले की, तुम्ही चार्जशीटची कॉपी सर्व आरोपींना दिली आहे का? प्रत्युत्तरादाखल अभिनेत्रीचे वकील प्रशांत पाटील म्हणाले की, ईडीने कोर्टाला चार्जशीटची कॉपी देणार असल्याचे सांगितले होते, मात्र त्यानंतरही ती मिळाली नाही. सप्लीमेंट्री चार्जशीटमध्ये जॅकलिनच्या नावाचा समावेश होता. यानंतर कोर्टाने ईडीला चार्जशीटची कॉपी सर्व आरोपींना देण्यास सांगितले. केंद्रीय एजन्सीने यासाठी वेळ मागितला. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणात पुढील तारीख दिली आणि तोपर्यंत जॅकलिनला दिलेला अंतरिम जामीन कायम ठेवला. मनी लाँड्रिंग प्रकरणात अंतरिम जामीन 10 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?
200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आरोपी सुकेश चंद्रशेखर सध्या तुरुंगात आहे. सुकेशवर त्याने दिग्गज लोकांसह अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. 17 ऑगस्ट रोजी ईडीने आरोपपत्र दाखल केले होते. ज्यामध्ये 200 कोटींच्या वसुलीच्या प्रकरणात जॅकलीनही आरोपी आढळली होती. यामध्ये अनेक साक्षीदार आणि पुराव्यांचा आधार घेण्यात आला. यानंतर न्यायालयाने त्यांना समन्स बजावले होते. जॅकलिनला मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी केल्यानंतर तिच्या वकिलाने जामीन अर्ज दाखल केला होता.

सुकेश चंद्रशेखरही जॅकलिनला इम्प्रेस करण्यासाठी महागडे गिफ्ट देत होता. जॅकलिनही सुकेशच्या प्रेमात होती. माध्यमाच्या वृतानुसार, जॅकलीन सुकेशसोबत लग्न करण्याचे स्वप्नही पाहू लागली होती.जॅकलिनने ठग सुकेश चंद्रशेखरला तिच्या स्वप्नांचा राजकुमार मानले होते. एवढेच नाही तर सुकेशला जॅकलिनसाठी 500 कोटींचा चित्रपट बनवायचा होता. जॅकलिनला आकर्षित करण्यासाठी सुकेशने प्रत्येक युक्ती अवलंबली आणि ती यशस्वीही झाली. सुकेशला माहित होते की जॅकलिन चित्रपटांच्या शोधात आहे आणि ती आणखी चित्रपट साइन करणार नाही, याचा फायदा घेत सुकेशने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्लॅन केला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘बिग बॉस’ विनर तेजस्वी प्रकाश करतेय मराठी चित्रपटात पदार्पण, बॉयफ्रेंडनेही मराठीतच केले कौतुक…

अब्दू रोजिकचा शत्रू हसबुल्ला येणार बिग बॉसमध्ये, लवकरच होणार वाईल्ड कार्ड एन्ट्री

हे देखील वाचा