अक्षय कुमारला रुस्तममधील ‘तो’ संवाद नडणार? न्यायालयाकडून अभिनेत्याला नोटीस, कोर्टात हजर राहण्याचे आदेश

अक्षय कुमारला रुस्तममधील 'तो' संवाद नडणार? न्यायालयाकडून अभिनेत्याला नोटीस, कोर्टात हजर राहण्याचे आदेश


मध्य प्रदेशमधील कटनी कोर्टाने चित्रपट अभिनेता अक्षय कुमार याच्याविरोधात एक नोटीस बजावली आहे. यानुसार त्याला 10 मार्चला कोर्टात हजर राहण्यास सांगितले आहे. तसेच, ही नोटीस ‘रुस्तम’ चित्रपटातील एका सीनच्या संदर्भात बजावण्यात आली आहे. हा चित्रपट 2018 साली प्रदर्शित करण्यात आला होता.

चित्रपटातील एका सीनमध्ये अक्षय कुमार वकिलाला ‘बेशरम’ म्हणताना दिसत आहे. यामुळे कटनीचे वकील मनोज गुप्ता यांनी याप्रकरणी खटला दाखल केला आहे. तसेच, कटनी कोर्टाचे न्यायाधीश सुशील कुमार यांनी अक्षय कुमारव्यतिरिक्त, झी एंटरटेनमेंट इंटरप्राईजेस लिमिटेडचे ​​अध्यक्ष सुभाष चंद्र, चित्रपट दिग्दर्शक टीनू सुरेश देसाई आणि चित्रपट कलाकार आनंद देसाई यांच्याविरूद्ध याचिका दाखल केली आहे.

अहवालानुसार वकिलांनी जी याचिका दाखल केली आहे ती, ‘रुस्तम’ चित्रपटाच्या सीनबाबत आहे. आरोपाप्रमाणे चित्रपटात क्रॉस तपासणीदरम्यान ‘बेशरम’ हा शब्द वापरण्यात आल्याचा आरोप केला गेला आहे. न्यायाधीशांनी सर्वांना 10 मार्चला कोर्टात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त इलियाना डिक्रूझ, अर्जन बाजवा आणि ईशा गुप्ता या कलाकारांनी महत्वाची भूमिका साकारली आहे. तसेच, चित्रपटात अक्षय कुमारने नौदलाच्या अधिकाऱ्यांची भूमिका केली होती, ज्याची पत्नी एका व्यावसायिकाच्या प्रेमात पडते.

अक्षय कुमारच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर, तो सध्या बर्‍याच चित्रपटांमध्ये काम करत आहे. लवकरच तो ‘सूर्यवंशी’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय या चित्रपटात कॅटरीना कैफची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले आहे. अजय देवगन आणि रणवीर सिंग देखील चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहेत.


Leave A Reply

Your email address will not be published.