Thursday, April 18, 2024

हॉलिवूड चित्रपटांना मागे ‘क्रू’ची गाडी सुसाट, इतके झाले बॉक्स ऑफिस कलेक्शन

करीना कपूर, (Kareena Kapoor)  तब्बू आणि क्रिती सेनन स्टारर चित्रपट ‘क्रू’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. राजेश ए कृष्णन यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा कॉमेडी ड्रामा लोकांना आवडला आहे. या चित्रपटाला समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच ‘क्रू’ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. अशातच आता चित्रपटाच्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईचे आकडेही समोर आले आहेत.

या चित्रपटाने ९.२५ कोटींचे खाते उघडले आहे. दुसऱ्या दिवसाच्या कमाईत साडेपाच टक्क्यांनी वाढ झाली असून चित्रपटाने 9.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाच्या कमाईत सातत्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत आतापर्यंत दोन दिवसांचे एकूण 29.25 कोटी रुपयांचे कलेक्शन झाले आहे. हे आकडे पाहिल्यानंतर चित्रपट आपले बजेट सहज वसूल करेल असा अंदाज बांधता येतो. या चित्रपटाचे बजेट 60 कोटी रुपये आहे.

‘क्रू’ने बॉक्स ऑफिसवर ‘गॉडझिला एक्स काँग’ आणि ‘आदुजीवितम’ या हॉलिवूड चित्रपटांचा सामना केल्याची माहिती आहे. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेमही मिळत आहे. ‘गॉडझिला एक्स काँग’ करिनाच्या चित्रपटापेक्षा जास्त कमाई करत आहे.

‘क्रू’च्या स्टार कास्टबद्दल सांगायचे तर, या महिला केंद्रित चित्रपटात दिलजीत दोसांझ आणि कपिल शर्मा देखील तीन सुंदरींसोबत मजा करताना दिसत आहेत. रिया कपूर आणि एकता कपूर यांनी मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

अथिया शेट्टी प्रेग्नंट आहे? वडील सुनील शेट्टी यांनी ‘डान्स दिवाने’ शोमध्ये दिली हिंट
राखी आणि आदिलचा वाद संपत संपेना; आदिल म्हणाला, ‘ती एकदम धोकेबाज आणि ढोंगी आहे..’

हे देखील वाचा