Saturday, July 27, 2024

अथिया शेट्टी प्रेग्नंट आहे? वडील सुनील शेट्टी यांनी ‘डान्स दिवाने’ शोमध्ये दिली हिंट

अभिनेत्री आणि सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीने गेल्या वर्षी क्रिकेटर केएल राहुलशी लग्न केले. आज अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांची गणना बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांमध्ये केली जाते. दोन्ही स्टार्स सोशल मीडियावर एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, हे जोडपे लवकरच आई- बाबा बनणार आहेत, असे संकेत अथिया शेट्टीच्या वडिलांनी दिले आहेत.

माध्यमातील वृत्तानुसार अथिया शेट्टी प्रेग्नंट आहे, याचा अंदाज सुनील शेट्टीच्या एका वक्तव्यावरून लावला जात आहेसुनील शेट्टी या लोकप्रिय डान्स रिॲलिटी शो ‘डान्स दिवाने’मध्ये माधुरी दीक्षितसोबत जजच्या भूमिकेत दिसत आहे. नुकताच या शोमध्ये एका खास एपिसोडचे आयोजन करण्यात आले होते, तो ‘आजी आजी-आजोबा स्पेशल’ एपिसोड होता. या एपिसोडदरम्यान शोची होस्ट भारती सिंहने गंमतीने सुनील शेट्टीला विचारले की, तो आजोबा झाल्यावर कसा वागेल.

यावर प्रतिक्रिया देताना सुनील शेट्टी जे बोलले त्यामुळे अथिया शेट्टीच्या प्रेग्नेंसीच्या अफवा आणखीनच वाढल्या. सुनील म्हणाला, ‘पुढचा सिझन आल्यावर मी आजोबासारखा स्टेजवर फिरेन’. आता सुनीलच्या वक्तव्यावरून असा अंदाज लावला जात आहे की, त्यांची मुलगी अथिया शेट्टी आणि जावई केएल राहुल आईवडील होणार आहे. जरी हे जोडपे नेहमीच त्यांचे आयुष्य खूप खाजगी ठेवत असले तरी, चाहत्यांना लवकरच काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘माहेरची साडी’ चित्रपटाच्या यशानंतर विजय कोंडके यांचा नवा चित्रपट भेटीला ‘लेक असावी तर अशी’
नितेश तिवारीच्या रामायणात आदिनाथ कोठारे साकारणार ‘भरत’ची भूमिका, या अभिनेत्रीची देखील झाली वर्णी

 

हे देखील वाचा