टेलिव्हिजनवर क्राइम शो प्रेक्षक खूप आवडीने पाहत असतात. या शोला भरभरून प्रतिसाद मिळत असतो. नुकत्याच समोर आलेल्या वृत्तानुसार टीव्हीवरील ‘क्राइम पेट्रोल’ आणि ‘सावधान इंडिया’ यासारख्या लोकप्रिय शोमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रींना चोरीच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी अटक केले आहे. कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये सगळ्या शूटिंग बंद होत्या. तेव्हा त्या दोघींकडे पैशाची कमतरता होती.
समोर आलेल्या माहितीनुसार, त्यांचा एक मित्र आरे कॉलनीमध्ये पेईंग गेस्ट चालवतो. काही दिवसांपूर्वी त्या दोघीही तिथे राहायला आल्या होत्या. आरे कॉलनी मधील रॉयल पाम परिसरात स्थित एक पॉश बिल्डिंगमध्ये राहत असलेल्या एका व्यक्तीच्या घरात या दोघीही १८ मेला पेईंग गेस्ट बनून गेल्या होत्या. या दरम्यान त्या दोघी घरातील पेईंग गेस्ट लॉकअपमध्ये ठेवलेले ३ लाख २८ हजार रुपये घेऊन फरार झाल्या.
पेईंग गेस्टने आरे पोलिसा स्टेशनमध्ये टीव्ही अभिनेत्री सुरभी सुरेंद्र लाल श्रीवास्तव आणि मोसिना मुख्तार शेख यांच्यावर पैशांची चोरी केल्याचा संशय व्यक्त केला होता. जेव्हा पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज चेक केले, तेव्हा त्यांना या दोघीजणी घराच्या बाहेर जाताना दिसल्या. (Crime petrol and savdhan india show’s actress arreted In theft charge)
आरे पोलीस स्टेशन मधील वरिष्ठ अधिकारी नूतन पवार यांनी सांगितले की, त्या दोघींनी टेलिव्हिजनवरील सर्वात जास्त चर्चेत असणाऱ्या क्राइम पेट्रोल आणि सावधान इंडियासोबत अनेक वेब सीरिजमध्ये देखील काम केले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी केलेले ५० हजार रुपये जप्त केले आहेत. दोघींनाही कोर्टामध्ये दाखल केले आहे. कोर्टाने त्या दोघींना २३ जूनपर्यंत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-गायक रोहित राऊत गिरवतोय प्रेमाचे धडे! जाणून घ्या कोण आहे त्याच्या आयुष्यातील ‘ती’ खास व्यक्ती
-‘धाकड’ सिनेमासाठी अर्जुन रामपालचे गजब ट्रान्सफॉर्मेशन; नवीन लूकमध्ये अभिनेत्याला ओळखणेही झाले कठीण
-अभिनेता वरुण सूदला झाली गंभीर दुखापत; ‘खतरो के खिलाडी’ शोमध्ये स्टंट करताना झाला अपघात