अभिनेता वरुण सूदला झाली गंभीर दुखापत; ‘खतरो के खिलाडी’ शोमध्ये स्टंट करताना झाला अपघात


टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये मालिकांच्या तोडीसतोड रियॅलिटी शोची देखील मोठी चलती आहे. सध्याच्या घडीला प्रत्येक चॅनेलवर लहान मोठे असे अनेक रियॅलिटी शो सुरु आहे. या शोचा एक वेगळा प्रेक्षक वर्ग आहे. कमी कालावधीसाठी असलेल्या या रियॅलिटी शोजला प्रचंड लोकप्रियता मिळते.

असा एक रियॅलिटी शो म्हणजे ‘खतरों के खिलाडी’. मागील अनेक वर्षांपासून ‘खतरों के खिलाडी’ हा शो सुरु आहे. दरवर्षी नवनवीन पर्व आणि कलाकार घेऊन येणारा हा शो सर्वांच्याच पसंतीचा आहे. स्पर्धेसाठी असलेले हटके आणि भीतीदायक स्टंट, सुंदर लोकेशन्स आणि रोहित शेट्टीचे खुमासदार सूत्रसंचालन यांमुळे हा शो प्रसिद्ध झाला.

सध्या या शो च्या ११ व्या पर्वाची शूटिंग दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनमध्ये सुरु आहे. या शो संदर्भातली नुकतीच एक बातमी समोर आली आहे. या शोमध्ये स्पर्धक म्हणून सामील झालेला अभिनेता वरुण सूद हा स्टंट करताना जखमी झाला आहे. वरुणला ताबडतोब हॉस्पिटममध्ये नेण्यात आले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वरूणला काही दिवसांचा आराम सांगितला आहे. वरुणला हाताला दुखापत झाली होती, सुदैवाने कोठेही फ्रॅक्चर झालेले नाही. त्याला डॉक्टरांनी काही दिवसांचा आराम सांगितला होता, मात्र जेव्हा त्याची तब्येत ठिक झाली, त्यानंतर लगेच तो सेटवर आला. (varun sood injured on the sets of khatron ke khiladi 11)

अशा घटना होऊन यासाठी रोहित शेट्टी सतर्क झाला आहे. वरुणने या शो पूर्वी वरुण सूद, रोडीज आणि स्प्लिट्सविला सारखे रियॅलिटी शो केले असून आता तो ‘खतरो के खिलाडी’मध्ये आला आहे. वरुण नेहमीच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या शो संबंधीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. नुकताच त्याने एक स्टंटपूर्वी तयार करत अस्नताचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.

या शो बद्दल अजून सांगायचे तर शो ची स्पर्धक आणि अभिनेत्री असलेली अनुष्का सेन कोरोना पॉसिटीव्ह आली आहे. मात्र सुदैवी इतर कोणत्याही स्पर्धकाला कोरोनाची लागण झालेली नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मुनमुन दत्ताला वादग्रस्त व्हिडिओवर न्यायालयाकडून मोठा दिलासा; कारवाई घेण्यात आली मागे

-‘बॅरिस्टर बाबू’च्या प्रेक्षकांसाठी खुशखबर; १० वर्षांच्या लीपनंतर, ‘ही’ अभिनेत्री साकारणार मोठ्या बोंदिताची भूमिका

-‘शेरनी’ बनलेल्या विद्याचा परफॉर्मन्स पाहून प्रभावित झाले प्रेक्षक; सोशल मीडियावर बांधले जातायेत अभिनेत्रीच्या कौतुकांचे पूल


Leave A Reply

Your email address will not be published.