गायक रोहित राऊत गिरवतोय प्रेमाचे धडे! जाणून घ्या कोण आहे त्याच्या आयुष्यातील ‘ती’ खास व्यक्ती


मराठी संगीत क्षेत्रातील तरुण आणि आघाडीचा गायक म्हणजे रोहित राऊत. तो त्याच्या नवनवीन गाण्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. रोहितने सारेगमप लिटिल चॅम्स या शोमधून त्याच्या संगीत क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली होती. आपल्या गोड आवाजाने सर्वांना मंत्र मुग्ध करणारा रोहित आता चांगलाच मोठा झाला आहे. संगीताचे सूर तर आहेतच, पण आता रोहित प्रेमाच्या सुरात रंगताना दिसत आहे. होय! सध्या रोहित त्याच्या लव्ह लाईफमुळे खूप चर्चेत आहे.

मागील अनेक दिवसांपासून रोहित आणि गायिका जुईली जोगळेकर यांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जर आपण रोहितचे सोशल मीडिया अकाऊंट पाहिले, तर तो सतत एका व्यक्तीसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसतो. ती व्यक्ती म्हणजेच जुईली जोगळेकर. रोहित आणि जुईली अनेक वेळा सोबत स्पॉट झाले आहेत. त्यांच्यातील मैत्री वाढली आहे. या मैत्रीचे रूपांतर आता प्रेमात झालेले दिसत आहे.

रोहित आणि जुईली गेल्या १० वर्षांपासून सोबत आहेत. अप्रत्यक्षपणे त्यांनी त्यांच्या नात्याची कबुली देखील सोशल मीडियावर दिली आहे. त्यांचे प्रेम हे दिवसेंदिवस फुलताना दिसत आहे. एकमेकांसोबत ते अगदी खुश दिसतात. (Marathi singer Rohit Raut fell in love with this singer)

रोहित हा ‘इंडियन आयडल’मध्ये दिसला होता. जुईली जोगळेकर ही ‘सुर नाव ध्यास नवा’ या शोमधून पुढे आली आहे. रोहितने अनेक गाणी गायली आहेत. यामध्ये ‘यारा यारा’, ‘शटरचा टाळा’, ‘मन मोहिनी’, ‘तू आहेस ना’, ‘हृदयात वाजे समथिंग’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘गोलू मोलू’ या सारख्या गाणी गायली आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मुनमुन दत्ताला वादग्रस्त व्हिडिओवर न्यायालयाकडून मोठा दिलासा; कारवाई घेण्यात आली मागे

-‘बॅरिस्टर बाबू’च्या प्रेक्षकांसाठी खुशखबर; १० वर्षांच्या लीपनंतर, ‘ही’ अभिनेत्री साकारणार मोठ्या बोंदिताची भूमिका

-‘शेरनी’ बनलेल्या विद्याचा परफॉर्मन्स पाहून प्रभावित झाले प्रेक्षक; सोशल मीडियावर बांधले जातायेत अभिनेत्रीच्या कौतुकांचे पूल


Leave A Reply

Your email address will not be published.