Thursday, June 1, 2023

आर्यनला क्लीन चिट मिळाल्यावर आली शत्रुघ्न सिन्हांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘शाहरुखने किंमत चुकवली…’

अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला शुक्रवारी (२७ मे) क्रूझ अं’मली पदार्थ प्रकरणात एनसीबीकडून क्लीन चिट मिळाली आहे. आर्यनला अटक झाल्यापासून शत्रुघ्न सिन्हा (Shatrugahn Sinha) यांनी शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबाला खूप पाठिंबा दिला. आता एनसीबीने आर्यनला क्लीन चिट मिळाल्यानंतर अभिनेते आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी एक संवाद साधताना आपली बाजू मांडली आहे.

म्हणाले, ‘माझी भूमिका बरोबर निघाली’
मीडियाला दिलेल्या मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “माझी भूमिका आता योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे. मी आर्यनलाच नाही, तर शाहरुख खानलाही पाठिंबा दिला. खरंतर तो शाहरुख खान असण्याची किंमत चुकवत होता. सरकारची ही कारवाई आणि प्रतिसाद कौतुकास्पद आहे. परंतु, त्याच वेळी मी असे म्हणेन की, असे दिसते की खूप उशीर झाला आहे.” (cruise drug case shatrughan sinha reaction on aryan khan getting clean chit)

कट रचणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे
शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, “निर्दोषाला गोवण्यात आणि कोणत्याही पुराव्याशिवाय, कोणत्याही तपासाशिवाय आणि कारणाशिवाय त्याला तुरुंगात पाठवण्यात सहभागी असलेल्या सर्वांना शिक्षा झालीच पाहिजे. यामुळे भविष्यात पुन्हा असे पाऊल उचलण्यापूर्वी ते हजार वेळा विचार करतील.”

शाहरुखचा मुलगा आहे म्हणून दिला त्रास
शत्रुघ्न सिन्हा म्हणतात की, या प्रकरणाशी संबंधित एनसीबी अधिकाऱ्यांनी एजन्सीचे नाव खराब केले आहे. ते म्हणाले, “केवळ भारतातील सर्वात लोकप्रिय अभिनेता शाहरुख खानचा मुलगा असल्यामुळे, त्याचा छळ करण्यात आला आहे. हे स्वीकारले जाऊ नये. विशेषतः NCB सारख्या उच्च प्रोफाइल संस्थेने तर नाहीच. शाहरुख खान ज्या वेदना, दुःख आणि असहायतेतून गेला आहे, ते मी समजू शकतो.”

कामावर परतणार आर्यन खान
मिळालेल्या माहितीनुसार, अं’मली पदार्थ प्रकरणात क्लीन चिट मिळाल्यानंतर आर्यन खान आपल्या कामावर परतण्याचा विचार करत आहे. काही काळापूर्वी जामीन मिळाल्यानंतर तो वेब सीरिजमध्ये काम करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. आता यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तो अमेरिकेला रवाना होणार आहे. क्लीन चिट मिळाल्यानंतर आर्यनला त्याचा पासपोर्ट परत मिळेल, जो या प्रकरणात त्याच्या सहभागानंतर एनसीबीने जप्त केला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा