मराठी चित्रपटसृष्टीतील ‘या’ मायलेकीच्या जोडीने मारली बाजी, एकाच पुरस्कार सोहळ्यात ‘सावी’ चित्रपटासाठी मिळाला पुरस्कार


अंबर भरारी व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आयोजित सहावा अंबरनाथ चित्रपट महोत्सव पार पडला आहे. या पुरस्कार सोहळ्यामध्ये अभिनेत्री श्री मेसवाल आणि त्यांची लहान चार वर्षाची मुलगी कृष्णा मेसवाल यांना पुरस्कार मिळाला आहे. एकाच पुरस्कार सोहळ्यात माय-लेकीला एकत्र मिळालेला हा पुरस्कार त्यांच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. श्री मेसवाल यांना सर्वोत्कृष्ट नकारात्मक स्त्री भूमिका आणि त्यांची कन्या कृष्णा मेसवाल हिला सर्वोत्कृष्ट बालकलाकार हे पुरस्कार मिळाले आहेत.

usha nadkarni

रविवारी (१९ डिसेंबर) रोजी स्वातंत्रवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे ६ वा अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव सोहळा पार झाला आहे. यावेळी मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक चित्रपटांचे समीक्षण करून त्यात विविध भागांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री, लेखक, दिग्दर्शक, कॅमेरामॅन, बाकी कलाकार यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. (actress shree maiswal and her daughter krushna maiswal get award)

या पुरस्काराच्या वेळी अनेक दिग्गज लोक उपस्थित होते. या कार्यक्रमात एक्स्प्रेस मिडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. मच्छिंद्र साठे उपस्थित होते. अभिनेत्री उषा नाडकर्णी देखील उपस्थित होत्या. सामाजिक क्षेत्रातून श्री आयुष्मान फाउंडेशनचे संस्थापक अनिल भुरूक, बालाजी श्री मोटर्सचे मालक रवींद्र भोसले आणि जेष्ठ दिग्दर्शक सुनील मांजरेकर, अभिनेते प्रदीप वेलणकर या लोकांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला आहे.

‘सावी’ या चित्रपटासाठी श्री मेसवाल यांना सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिकेसाठी पुरस्कार मिळाला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे. तसेच श्री मेसवाल यांची ४ वर्षाची मुलगी कृष्णा हिला देखील सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून पुरस्कार मिळाला आहे. मायलेकींच्या या यशावर संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीतून त्यांच्यावर शुभेच्छांचा पाऊस पडत आहे.

हेही वाचा :

संकर्षण कऱ्हाडेची मुलं झाली ६ महिन्यांची, सर्वज्ञ आणि स्रग्वीचा सुंदर फोटो केला शेअर

कुटुंबासोबत मालदिवमध्ये वाढदिवस साजरा करते ट्विंकल खन्ना व्हिडिओ शेअर करत लिहिले…

वाढदिवशी गाडीसोबत फोटो शेअर करून रुपाली भोसलेने दिल्या स्वतःलाच शुभेच्छा, म्हणाली

 


Latest Post

error: Content is protected !!