संकर्षण कऱ्हाडेची मुलं झाली ६ महिन्यांची, सर्वज्ञ आणि स्रग्वीचा सुंदर फोटो केला शेअर


मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आणि होस्ट संकर्षण कऱ्हाडे हा सध्या चांगलाच लोकप्रिय झाला आहे. सध्या तो ‘माझी तुझी रेशीमगाठ‘ मालिकेत काम करत आहे. त्याची समीर नावाची भूमिका सगळ्यांना खूप आवडत आहे. मागील काही महिन्यांपूर्वी त्याने त्याला जुळी झाली आहेत, ही माहिती सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांना दिली होती. त्याला एक मुलगा आणि मुलगी झाली आहे. अशातच त्याने त्याच्या मुलांचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे.

संकर्षणने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्याच्या मुलांसोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, त्याच्या मुलांचे तोंड दिसत नाहीये. त्या दोघांना देखील सारखा ड्रेस घातला आहे. मुलीला लाल रंगाचा ड्रेस घालून हेअर बॅंड लावला आहे. तसेच मुलाला पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. या फोटोमध्ये संकर्षण मुलांकडे बघत आहे. तो या फोटोमध्ये खूपच खुश दिसत आहे. (Sankarshan karhade’s twins baby complete 6 month, actor share photos on social media post)

हा फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, “सहा महिन्याच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, सर्वज्ञ स्रग्वी.” त्यांच्या या फोटोवर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. या फोटोवर तेजस्विनी पंडित, श्रेया बुगडे, अभिजित खांडकेकर, सुयश टिळक, प्रसाद ओक, पूजा सावंत, सायली संजीव, ऋता दुर्गुळे, अन्विता फलटणकर यांनी हार्ट ईमोजी पोस्ट केल्या आहेत. तसेच त्याचे अनेक चाहते देखील या फोटोवर कमेंट करत आहेत.

संकर्षण कऱ्हाडे याने अनेक चित्रपटात तसेच मालिकांमध्ये देखील काम केले आहे. त्याने ‘खोपा’, ‘नागपूर अधिवेशन’ आणि ‘वेडिंगचा शिनेमा’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच त्याने ‘देवा शप्पथ’, ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकांमध्ये काम केले आहे. त्याने ‘आम्ही सारे खवय्ये’ हा शोही होस्ट केला आहे.

हेही वाचा :

कुटुंबासोबत मालदिवमध्ये वाढदिवस साजरा करते ट्विंकल खन्ना व्हिडिओ शेअर करत लिहिले…

वाढदिवशी गाडीसोबत फोटो शेअर करून रुपाली भोसलेने दिल्या स्वतःलाच शुभेच्छा, म्हणाली…

शाहिदच्या बहुचर्चित ‘जर्सी’ सिनेमाचे प्रदर्शन रद्द, कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे चित्रपटाच्या टीमचा निर्णय 

 


Latest Post

error: Content is protected !!