कुटुंबासोबत मालदिवमध्ये वाढदिवस साजरा करते ट्विंकल खन्ना व्हिडिओ शेअर करत लिहिले…


बॉलिवुड अभिनेत्री ट्विंकल खन्ना तिच्या वाढदिवसानिमित्त कुटुंबासोबत मालदिव येथे गेली आहे. आज (२९ डिसेंबर) ट्विंकल तिचा ४८वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्यासोबत तिचा नवरा अक्षय कुमार आणि त्यांची मुलगी मालदिवला पोहोचले आहेत. तिच्या वाढदिवसाचा दिवस खास बनवण्यासाठी तिचे कुटुंब तयारी करत आहे. ट्विंकल खन्ना वाढदिवसाच्या निमित्ताने सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. तिने तिच्या या एन्जॉयमेन्टचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

ट्विंकल खन्ना ही उत्तम लेखिका असून, तिने अनेक वृत्तपत्रांमध्ये लिखाण केले असून, काही पुस्तके देखील लिहिली आहेत. शिवाय ट्विंकल एक इंटिरियर डिझायनरसुद्धा आहे. तिने तिच्या कामातून वेळ काढून आपल्या कुटुंबासोबत तिच्या सुट्ट्या एन्जॉय करत आहेत. ट्विंकल खन्नाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर मालदिवचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तिने सुंदर ड्रेस घातलेला दिसत असून, ती तिच्या मुलीकडे चालत चालत येत तिला मिठी मारते. तिने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे. ‘माझ्या वाढदिवसाची सुरुवात माझ्या रोमरोमात जाणाऱ्या सोनेरी उन्हाने सुरू झाली आहे. माझे केस निळा समुद्रासारखे खारट असुन माझे हृदय भरून आले आहे.’

व्हिडिओमध्ये ते समुद्राच्या मध्यभागी पुलावर फिरताना दिसत आहे. त्या व्हिडिओच्या पाठीमागे एक सुंदर हॉटेल देखील दिसत आहे. ट्विंकल खन्नाच्या या व्हिडिओला ८ लाखांपेक्षा जास्त लाईक मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहून नेटकरी ट्विंकल खन्नाचे चाहते तिची खूप कौतुक देखील करत आहे. ट्विंकल खन्नाला अक्षय कुमारने देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षयने सोशल मीडियावर त्याचा आणि ट्विंकलचा एक फोटो पोस्ट करत लिहिले, “‘तू माझ्यासोबत आहेस, त्यामुळे मला आयुष्यातील सर्व अडचणींशी लढणे माझ्यासाठी सोपे झाले. टीना वाढदिवसाच्या शुभेच्छा.’ ट्विंकल खन्नाने १९९५ मध्ये बरसात या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. तिने खूप सार्‍या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिला आता एक लेखक म्हणून देखील ओळखले जाते.

हेही वाचा :

शाहिदच्या बहुचर्चित ‘जर्सी’ सिनेमाचे प्रदर्शन रद्द, कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे चित्रपटाच्या टीमचा निर्णय

सलमान खानच्या ‘सुलतान’ चित्रपटासाठी ‘ही’ अभिनेत्री होती पहिली पसंती, खुद्द अभिनेत्यानेच केला खुलासा

ट्विटरवर ‘अतरंगी रे’ विरोधात मोहीम, अक्षय-सारा अन् धनुषच्या चित्रपटावर ‘या’ गोष्टीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप


Latest Post

error: Content is protected !!