बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा जास्त लोकप्रिय आहे ही चिमुकली, आज बनलीय टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील मोठ्ठं नाव


बॉलिवूडमधील कलाकारांचे लहानपणीचे फोटो पाहण्यासाठी चाहते अतिशय उत्सुक असतात. कलाकारांचे लहानपणीचे फोटो पाहिले की, चाहत्यांचा दिवस चांगला जातो. कलाकार देखील चाहत्यांना खुश करण्याची एकही संधी गमावत नाहीत. ते नेहमीच व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशातच आता एक गोड मुलीचा फोटो समोर आला आहे. हा फोटो एका टेलिव्हिजन अभिनेत्रीचा आहे. काही युजर्सना हा फोटो कोणाचा आहे, हे ओळखता आले नाही. या अभिनेत्रीची चाहतावर्ग खूप जास्त आहे. ही जरी टेलिव्हिजन अभिनेत्री असली, तरी तिचा चाहतावर्ग बॉलिवुड अभिनेत्रीपेक्षा कमी नाहीये.

तुम्ही ओळखलं का या गोंडस मुलीला? जर नसेल तर तुम्हाला सांगताना खूप आनंद होत आहे की. हा फोटो टेलिव्हिजन अभिनेत्री जन्नत जुबैरचा (Jannat Zubair) आहे. ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील खूप प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचा चाहतावर्ग देखील खूप जास्त आहे. जन्नतचे इंस्टाग्रामवर ४० मिलियन फॉलोवर्स आहेत. तिच्यासोबत शिल्पा शेट्टी आणि सोनू सूदसारख्या कलाकारांनी रील्स बनवले आहेत. (cute little girl is a big tv actress today and more popular than bollywood heroines)

या फोटोमध्ये ती खूप गोंडस दिसत आहे. तिने नारंगी रंगाचा ड्रेस घातला आहे. तिची स्माईल खूप गोड आहे. या फोटोमध्ये तिने तिचे केस मोकळे सोडलेले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार जन्नत जुबैर जेव्हा ८ वर्षांची होती, तेव्हापासून तिने अभिनय क्षेत्रांमध्ये तिच्या करिअरला सुरुवात केली. तिने ‘फुलवा’, ‘तू आशिकी’, ‘मिट्टी की बन्नू’, ‘काशी-अब ना रहे तेरा कागज कोरा’ आणि ‘भारत के वीर पुत्र: महाराणा प्रताप’ यासारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ‘तु आशिकी’ या मालिकेने तिने सर्वांचे मन जिंकले होते.

जन्नत जुबैर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नेहमी तिच्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिने खूप कमी वयामध्ये उंचीचे शिखर गाठले आहे. तिने इंस्टाग्रामवर लहानपणीचे काही फोटो सोशल मीडियावर देखील शेअर केली आहेत. त्यातीलच हा एक फोटो आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!