Saturday, July 27, 2024

दादासाहेब फाळके पुरस्कार: आलिया, रणबीर ठरले सर्वोत्कृष्ट कलाकार, ‘हा’ सिनेमा ठरला बेस्ट जाणून घ्या विजेत्यांची नावे

भारतीय सिनेसृष्टीचे जनक असलेल्या दादासाहेब फाळके यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार हा हिंदी सिनेविश्वातील सर्वात मोठा आणि मानाचा समजला जातो. मनोरंजनविश्वातील उत्कृष्ट योगदानासाठी धुंडीराज गोविंद फाळके या नावाने हा पुरस्कार प्रदान केला जातो. यावर्षी देखील अनेक मोठ्या कलाकारांना या पुरस्काराने सन्मानित केले गेले. मुंबईमध्ये झालेल्या या समारंभाला अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

या सोहळ्याला आलिया भट्ट, वरुण धवन, रेखा, अनुपम खेर,विवेक अग्निहोत्री, ऋषभ शेट्टी, रोनित रॉय, श्रेयस तळपदे, आर बाल्की आदी अनेक कलाकारांनी उपस्थित लावली. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांना देखील दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवले गेले. विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळवला. विवेक अग्निहोत्री यांनी बद्दल एक पोस्ट देखील ट्विटर अकाऊंटवरून शेअर केली आहे. या सोहळ्यामध्ये विविध विभागांमध्ये अनेक कलाकरांना हा पुरस्कार दिला गेला जाणून घेऊया संपूर्ण पुरस्कार विजेत्यांची नावे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

जाणून घ्या विजेत्यांची यादी…

सर्वोत्कृष्ट चित्रपट: द काश्मीर फाइल्स
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: आर बाल्की (चूप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट)
सर्वोत्कृष्ट अभिनेता: रणबीर कपूर (ब्रह्मास्त्र: भाग १)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: आलिया भट्ट (गंगूबाई काठियावाडी)
मोस्ट प्रॉमिसिंग अभिनेता: ऋषभ शेट्टी (कांतारा)
चित्रपट उद्योगातील अतुलनीय योगदानासाठी दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२३ पुरस्कार: रेखा
सर्वोत्कृष्ट वेब सिरीज: रुद्र: द एज ऑफ डार्कनेस
क्रिटिक्स सर्वोत्कृष्ट अभिनेता: वरुण धवन (भेडिया)
वर्षभरातील सर्वोत्तम चित्रपट: RRR
वर्षभरातील सर्वोत्तम दूरदर्शन मालिका: अनुपमा
यंदाच्या वर्षातील सर्वात अष्टपैलू अभिनेता: अनुपम खेर (काश्मीर फाइल्स)
टेलिव्हिजन मालिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता: झैन इमाम (फना-इश्क में मरजावा)
सर्वोत्कृष्ट पुरुष गायक: सचेत टंडन (मैय्या मैनु)
सर्वोत्कृष्ट गायिका: नीती मोहन, मेरी जान
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर: पीएस विनोद (विक्रम वेधा)
संगीत उद्योगातील अतुलनीय योगदानासाठी दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२३ पुरस्कार: हरिहरन

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूडमधील अभिनेता आयुष्मान खुराना झाला ‘युनिसेफ इंडिया’चा ब्रँड एम्बेसिडर
स्वराने ट्वीटमध्ये ‘भाऊ’ म्हटल्यानंतर होणाऱ्या ट्रोलिंगला फहादने दिले चाेख उत्तर; म्हणाला, ‘हिंदू-मुस्लिम भाऊ…’

हे देखील वाचा