Monday, October 2, 2023

काळीज तोडणारी बातमी! बॉलिवूडच्या प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

कलाविश्वातून काळीज तोडणारी बातमी समोर येत आहे. 1991 साली रिलीज झालेल्या सलमान खान अभिनित ‘सनम बेवफा’ सिनेमाला संगीत देणारे दिग्गज संगीतकार महेश शर्मा यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 71व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. ते दीर्घ आजाराने ग्रस्त होते. त्यांच्या निधनामुळे संगीतविश्वाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनावर चाहत्यांकडून शोक व्यक्त केला जात आहे. (shocking sanam bewafa movie famous music composer mahesh sharma passes away)

प्यारेलाल शर्मांचे बंधू
महेश शर्मा (Mahesh Sharma) हे बॉलिवूडची दिग्गज संगीतकार जोडी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्यापैकी प्यारेलाल शर्मा (Pyarelal Sharma) यांचे बंधू होते. त्यांनी आपल्या गाण्यांनी आणि सिनेमांनी अनेक सिनेमे अमर केली. खरं तर, महेश शर्मा यांनी त्यांचे मित्र किशोर शर्मा यांच्यासोबत मिळून ‘इक्के पे इक्का’, ‘चांद का तुकडा’, ‘एक ही रास्ता’, ‘कमसिन’, ‘नजर के सामने’ यांसारख्या अनेक सिनेमांना आपल्या संगीताने सुपरहिट बनवले होते.

दिवंगत संगीतकार यांचे कौटुंबिक मित्र रिज डाईने माध्यमांशी बोलताना सांगितले की, महेशजी त्यांना मुलासारखे मानत होते. त्यांचा मुलगा गुरू शर्मा याने महेश शर्माच्या निधनाची बातमी फोनवरून दिली होती. रिज डाईम म्हणाला की, “त्यांच्याशी माझे घनिष्ठ नाते होते. कार्यक्रम आयोजित केल्यानंतर त्यांना सन्मानित करण्यात आले. मात्र, त्यावेळी त्यांची तब्येत ठीक नव्हती. त्यामुळे त्यांनी घरी बोलावून हा पुरस्कार दिला होता.”

या सिनेमातून मिळाली प्रसिद्धी
मनू शर्मा आणि गुरू शर्मा ही त्यांची दोन मुलेही प्रसिद्ध संगीतकार आहेत. महेश एक व्हायोलिन वादकही होते. त्यांच्या कुटुंबीयांमध्ये प्यारेलाल, नरेश शर्मा, आनंद शर्मा, गणेश शर्मा आणि गोरख शर्मा यांचाही समावेश आहे. सलमान खान याची भूमिका असलेल्या ‘सनम बेवफा’ सिनेमाने त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली होती. त्यांनी किशोरसोबत या सिनेमाचे संगीत तयार केले होते. त्यांचे ‘चूडी मजा ना देगी, कंगन मजा ना देगा’ हे गाणे तुफान गाजले होते. विशेष म्हणजे, त्यांचे हे गाणे आजही तितकेच पसंत केले जाते.

हेही वाचा-
‘Kaavaalaa’ गाण्यावर डान्स करताच अभिनेत्री ट्रोल; नेटकरी म्हणाले, ‘ओव्हर ऍक्टिंगचे 50 रुपये कट’
हुबेहूब सुशांतसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला पाहून हादरले चाहते; राखी सावंतही म्हणाली, ‘तो बदला घेण्यासाठी…’

हे देखील वाचा