सोनाली कुलकर्णीने डान्सर फुलवासोबत साजरी केली १० वर्षांची मैत्री; खास व्हिडिओ आला समोर


आपल्या सर्वांच्या जीवनात मैत्रीला खूप महत्व आहे. कधी कधी तर रक्ताच्या नात्यापेक्षा हे मैत्रीचे नाते आपल्याला जवळचे वाटू लागते. शाळेत असताना, कॉलेजमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी आपल्याला काही असे मित्र मैत्रिणी मिळतात, त्यांची मैत्री आयुष्यभरासाठी पुरेल अशी असते. मराठमोळ्या सोनाली कुलकर्णीच्या आयुष्यातही अशी एक मैत्रीण आहे, जिच्यासोबत तिने मैत्रीची १० वर्षे पूर्ण केली आहेत. ही मैत्रीण आहे, डान्सर आणि कोरिओग्राफर फुलवा.

होय, सोनाली आणि फुलवाच्या मैत्रीला नुकतेच १० वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने सोनाली कुलकर्णीने एक खास पोस्ट शेअर केली आहे. तिने एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. यात दोघीही ‘आइये मेहरबान’ या गाण्यावर अतिशय स्टाईलमध्ये नाचताना दिसत आहेत. चाहत्यांना हा डान्स व्हिडिओ खूप आवडल्याचे दिसून येत आहे.

हा व्हिडिओ शेअर करून तिने भलंमोठं कॅप्शनही लिहिलं आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “१० वर्षांची मैत्री, प्रेम, आदर आणि विश्वास साजरा करत आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येक परिसिस्थीत एकमेकांसोबत उभे राहणे! चांगले आणि वाईट, आनंदी आणि दु: खी…हे सर्व नाचत आहे….” (dancer phulawa and actress sonalee kulkarni celebrating their 10 years of friendship)

फुलवाने देखील हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंट शेअर केला आहे. सोबतच तिने त्यांच्या फोटोही शेअर केला आहे. चाहत्यांनी यावर शुभेच्छाचा पाऊस पाडला आहे. सोनालीच्या व्हिडिओवर ३४ हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.