Thursday, April 24, 2025
Home भोजपूरी सपना चौधरीची ३ तासांची फी जाणून उंचावतीय भुवया! आधी मिळायचे ३१ हजार तर आता करतेय लाखांत कमाई

सपना चौधरीची ३ तासांची फी जाणून उंचावतीय भुवया! आधी मिळायचे ३१ हजार तर आता करतेय लाखांत कमाई

छोट्या-छोट्या स्टेज शोमधून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या सुप्रसिद्ध हरियाणवी डान्सर सपना चौधरीचे आयुष्य आज खूप आलिशान आहे. सपना सोशल मीडियावर देखील एक प्रसिद्ध नाव आहे. बिग बॉसपासून तिची लोकप्रियता आणखी वाढली आहे. सपना आज अनेक आलिशान वाहनांची मालकीण आहे. अशा परिस्थितीत ती शोसाठी किती फी घेते हे जाणून तुमचे होश उडाले असतील. खरंच, सपनाची फी देखील तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते. एका मुलाखतीदरम्यान सपनाने खुलासा केला होता की, ती एका शोसाठी किती फी घेते.

मुलाखतीदरम्यान सपनाने (Sapna Choudhary) सांगितले होते की, ती एका शोसाठी हजारात नाही, तर लाखांमध्ये फी घेते. याचा अर्थ सपना चौधरी एका स्टेज शोचे शुल्क २५ लाखांपर्यंत घेते. हा कार्यक्रम संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत असतो. माध्यमांतील वृत्तानुसार, सपना चौधरी २ ते ३ तास कार्यक्रमाला गेल्यास तीन लाख रुपये शुल्क आकारते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात सपनाला स्टेज शो करण्यासाठी फक्त ३१०० रुपये मिळत होते आणि आज ती इतकी मोठी रक्कम घेते.

यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की, सपना चौधरीची लोकप्रियता किती वाढली आहे. इतकंच नाही, तर तिच्या स्टेटसमध्येही खूप बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. सपना चौधरीने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला लहानपणापासूनच इन्स्पेक्टर व्हायचे होते. पण वडिलांच्या निधनाने तिचे स्वप्न भंगले. घराचा सर्व भार १३ वर्षांच्या सपनाच्या खांद्यावर पडला. अशा परिस्थितीत तिने तिचा व्यवसाय म्हणून डान्सची निवड केली. सपनाला डान्स करायला आवडते.

सपना चौधरीने हरियाणाच्या ऑर्केस्ट्रा पार्टीमधून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर ती हरियाणाच्या लगतच्या राज्यांमध्ये कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ लागली. हळूहळू तिची लोकप्रियता वाढू लागली. ती ‘बिग बॉस ११’ चा देखील भाग राहिली आहे. सपनाने ‘दोस्ती के साइड इफेक्ट्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट काही विशेष करू शकला नाही. पण सपना म्युझिक व्हिडिओ आणि स्टेजवर सतत धमाल करत आहे.

हेही वाचा :

‘माझे स्वप्न अपूर्ण राहिले’, लता दीदींबद्दल बोलताना ‘हा’ चित्रपट निर्माता भावूक

जेवढ्या चांगल्या सवयी तितका यशस्वी माणूस! असा होता लता मंगेशकर यांचा दिनक्रम

…म्हणून कॅटरिना कैफने थेट दाबला सलमान खानचा गळा, पाहा संपूर्ण व्हिडिओ

हे देखील वाचा