×

लग्नाच्या वाढदिवशी रोमँटिक झाली सपना चौधरी, म्हणाली ‘हॅपी एनिवर्सरी पोरस के पापा’

हरियाणवी डान्सर सपना चौधरीच्या स्टाईल आणि डान्सचे लाखो चाहते आहेत. चाहते तिच्या गाण्यांवर जोरदार डान्स करतात. सपनाच्या प्रत्येक अदेवर तिचे चाहते नेहमीच मरण्यासाठी तयार असतात. अनेक अडचणींना सामोरे गेल्यानंतर तिने हे स्थान मिळवले आहे. आज ती तिच्या चाहत्यांमध्ये ‘हरियाणवी डान्स क्वीन’ म्हणून प्रसिद्ध आहे. सपना ही केवळ हरियाणाचीच नाही, तर आता संपूर्ण देशाची शान आहे. कोरोनामुळे सपना स्टेजपासून दूर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

सपनासाठी जानेवारी महिना खूप खास आहे. याच महिन्यात वीर साहूसोबत तिचा विवाह झाला होता. लग्न थाटामाटात पार पडू शकले नाही, पण यावेळी सपनाने हा दिवस खास पद्धतीने साजरा केला. तिच्या दुसऱ्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सपना वीर साहूसोबत खूप रोमँटिक दिसत आहे. तिने एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना त्याची झलक दाखवली आहे.

सपना चौधरीने एक खास पोस्ट केली शेअर

सपनाने (Sapna Choudhary) तिच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पती वीर साहूसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघे फायर लूकमध्ये दिसत आहेत. फोटो शेअर करताना तिने पोरसच्या वडिलांसाठी खास कॅप्शनही लिहिले आहे.

View this post on Instagram

A post shared by Sapna Choudhary (@itssapnachoudhary)

पोरसच्या वडिलांवर व्यक्त केले प्रेम

सपनाने रोमँटिक फोटोसोबत कॅप्शन लिहिले आहे की, “लाख़ां दिलां की धड़कन की आज काल हूं, धड़कन मैं कदे-कदे कट्ठे दिखां, लोगां कै रड़कन नै… हॅप्पी मॅरेज ॲनिव्हर्सरी पोरसचे पापा.” यासोबतच सपनाने हार्ट इमोजीही शेअर केला आहे.

प्रेमाने भरलेला फोटो 

फोटोबद्दल बोलायचे झाले, तर सपना देखील फोटोत तिच्या हाताचा टॅटू फ्लॉंट करताना दिसत आहे. त्याचवेळी, वीर साहूचा मोकळ्या केसांचा लूक पाहून चाहते दंग झाले आहेत. सपनाचे चाहते दोघांनाही त्यांच्या खास दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा देत आहेत.

चाहते करत आहेत कमेंट्स

पोरसच्या आईवर फॅन्सही कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिले की, “पोरसची आई तुझेही अभिनंदन.” आणखी एका युजरने लिहिले की, “अभिनंदन अभिनंदन आनंदी जोडप्याला राम असेच ठेवा, सदैव आनंदी राहा.” दोघांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा :

Latest Post