Tuesday, June 18, 2024

राडाच की! ‘ठेके आली गली’ गाण्यावर सपना चौधरीने लावले ठुमके, व्हिडिओला मिळाले १० कोटी हिट्स

आपली कला सादर करून केवळ आपल्या शहरापुरतं मर्यादित न राहता संपूर्ण देशभरात आपला डंका वाजवण्याची धमक फार कमी व्यक्तींमध्ये असते. कुणी अप्रतिम विनोद करतं, कुणी अभिनय, तर कुणी दिग्दर्शन. यासर्वांमध्ये आणखी एका कलेचा समावेश होतो ते म्हणजे डान्स होय. आज भारतात असंख्य डान्सर्स आहेत. त्यांनी खूप मेहनतीने आज यशाचे शिखर गाठले आहे. यामध्ये समावेश होतो तो म्हणजे हरियावणी डान्सिंग क्वीन सपना चौधरीचा (Sapna Choudhary).

ऑर्केस्ट्रापासून कारकिर्दीची सुरुवात करणारी सपना आज भारतातील प्रत्येक घराघरात ओळखली जाते. सपनाच्या हरियाणवी गाण्यांचा डंका प्रत्येक चाहत्यापर्यंत पोहोचला आहे. सपना आपल्या डान्सव्यतिरिक्त सोशल मीडियावरही कमालीची सक्रिय असते. सपनाचे डान्स व्हिडिओ प्रदर्शित होता क्षणीच व्हायरल होऊ लागतात. सपना जेव्हा प्रेक्षकांमध्ये ठुमके लावण्यास सुरुवात करते, तेव्हा प्रचंड संख्येने प्रेक्षक गर्दी करतात. तसेच, तिच्या डान्सचे दीवाने होतात. अशातच सपनाचे ‘ठेके आली गली’ गाण्याचा डान्स व्हिडिओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे. (Dancer Sapna Choudhary Theke Aali Gali Dance Song Video Sets Internet On Fire)

खरं तर, धमाकेदार ‘ठेके आली गली’ (Theke Aali Gali) या गाण्यात सपनाचा देसी अंदाज पाहायला मिळत आहे. सपना या गाण्यात लटके- झटके दाखवताना दिसत आहे. अभिनेत्रीच्या या ठुमक्यांवर उपस्थित प्रेक्षक जोरजोरात टाळ्यांचा गजर करत आनंद घेत आहेत.

सपनाचा हा व्हिडिओ सोनोटेक पंजाबी या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत १० कोटी ६० लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, या व्हिडिओला १ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स आणि ८ हजारांपेक्षाही अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत.

सपना चौधरी ही आघाडीची हरियाणवी डान्सर आहे. ती अभिनेता सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉसच्या ११ व्या पर्वातही झळकली आहे. त्यानंतर तिच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली. याव्यतिरिक्त तिचे अनेक म्युझिक अल्बमही युट्यूबवर पाहायला मिळतात. तिच्या गाण्यांना चाहत्यांची जबरदस्त पसंती मिळते.

सपनाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचं झालं, तर तिने मागील वर्षाच्या सुरुवातीला हरियाणवी गायक वीर साहूसोबत लग्न केले होते. या जोडप्याला एक मुलगाही आहे. सपना आपल्या पतीसोबतचे फोटो आणि व्हिडिओ सतत शेअर करत असते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘आरआरआर’चे नवे ‘जननी’ गाणे आले प्रेक्षकांच्या भेटीला, देशभक्ती पाहून तुम्हीही व्हाल भावुक

-‘तुझे अक्सा बीच घूमा दूं’ गाण्यावर अनुपमा आणि अनुजने रस्त्यावर केला धमाकेदार डान्स

-‘डॅड स्टॉप इट यार!’, एनसीबीच्या ऑफिसबाहेर वडिलांचे वागणे पाहून वैतागला आर्यन खानचा मित्र अरबाज मर्चंट

हे देखील वाचा