Tuesday, July 23, 2024

क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरला आणि त्याच्या मुलींनाही लागले ‘पुष्पा’ सिनेमाचे वेड, सामी सामी गाण्यावरील डान्स व्हिडिओ व्हायरल

भारतीय चित्रपटांची भुरळ अनेकदा परदेशी लोकांना पडल्याचे आपल्याला अनेकदा दिसते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात तर बऱ्याच परदेशी नागरिकांचे भारतीय सिनेमांवरील प्रेम सर्वांसमोर येत असते. मागच्या काही काळापासून संपूर्ण सोशल मीडिया आणि देशावर एकाच चित्रपटाचे खूळ निर्माण झाले आहे आणि तो सिनेमा म्हणजे ‘पुष्पा’. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा हा ‘पुष्पा’ सिनेमा चित्रपटगृहांमध्ये, ओटीटीवर तुफान गाजताना दिसत आहे. या सिनेमाच्या गाण्यांनी, संवादांनी आणि कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले आहे. या सिनेमातील अल्लू अर्जुनच्या डान्सने आणि स्टाईलने देशासोबत आणि परदेशातील लोकांना देखील वेड लावले. एवढेच काय तर परदेशी क्रिकेटर्सल देखील या सिनेमाने क्रेझी केले आहे.

ऑस्ट्रेलियातील दिग्गज फलंदाज असणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला देखील अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ सिनेमाने वेड लावले. तसे पाहिले तर डेव्हिड भारतीय सिनेमांचा किती मोठा चाहता आहे, हे त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून आपल्या लक्षात येईलच. तो नेहमीच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एकापेक्षा एक भारी व्हिडिओ शेअर करत असतो. आता डेव्हिड वॉर्नरने ‘पुष्पा’ सिनेमातील प्रसिद्ध संवाद आणि स्टाईल कॉपी करत ‘श्रीविल्ली’ गाण्यावर डान्स करत तुफान लाईमलाइट मिळवले आहे. नुकताच त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला असून, या व्हिडिओमध्ये डेव्हिड तर दिसत नाही मात्र त्याच्या तीन मुली नक्कीच दिसत आहे.

डेव्हिड वॉर्नरने त्याच्या मुलीचा ‘पुष्पा’ सिनेमातील रश्मिकाच्या ‘सामी-सामी’ गाण्यावरील एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. या रील व्हिडिओमध्ये त्याच्या तिघी मुली खूपच सुंदर डान्स करताना दिसत असून, त्याच्या या व्हिडिओवर सर्वच लोकं त्यांचे कौतुक करत आहे. डेव्हिड वॉर्नरने हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “पालकांच्या आधी माझ्या मुली ‘पुष्पा’ सिनेमातील ‘सामी सामी’ गाण्यावर डान्स करू इच्छित होत्या.” हि पोस्ट डेव्हिडने त्याच्या पत्नी असलेल्या कँडी वॉर्नरला देखील टॅग केली आहे. आता पर्यंत या व्हिडिओला ५ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले असून, भरपूर कमेंट्स देखील आल्या आहेत. या तिघी मुलींच्या क्युट व्हिडिओचे कौतुक करताना फॅन्स थकत नसल्याचे दिसत आहे. Ivy Mae Warner, Indi Rae Warner आणि Isla Rose Warner या वॉर्नरच्या तीन मुली आहेत. या तिघी रश्मिकाला जोरदार टक्कर देताना दिसत आहे.

डेव्हिड वॉर्नरबद्दल सांगायचे झाल्यास त्याचा देखील ‘पुष्पा’ सिनेमावर आधारित असलेला एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो ‘श्रीविल्ली’ गाण्यावर डान्स करत आहे. हा व्हिडिओ पाहून फॅन्सने त्याला बेस्ट ऍक्टर म्हणून सांगितले आहे. याशिवाय त्या ‘पुष्पा’ सिनेमाच्या दुसऱ्या भागातून अभिनयात पदार्पण करण्याचा सल्ला देखील देत आहे. आता वॉर्नरच्या मुलींच्या डान्स व्हिडिओमुळे त्याच्या मुलींचे देखील भारतीय चित्रपटांबद्दल असलेले प्रेम सर्वांसमोर आले आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा