Tuesday, July 9, 2024

Video: पहिल्यांदाच सासरी पोहोचली अभिनेत्री देबीना बॅनर्जी, सासरच्यांकडून जंगी स्वागत

छोट्या पडद्यावर ‘सीता’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री देबीना बॅनर्जी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. आपले अनेक फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावरून चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतीच देबीना पहिल्यांदा तिच्या सासरी गेली होती. त्यावेळचा सगळा प्रवास तिने एका व्हिडिओमधून दाखवला आहे. हा व्हिडिओ तिने तिच्या यूट्यूब चॅनेलवर पोस्ट केला आहे, ज्याला चाहत्यांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे.

देबीना बॅनर्जी 2008 मध्ये आलेल्या ‘रामायण’ मालिकेत ‘सीता’च्या भूमिकेतून घराघरात पोहोचली होती. या मालिकेतील देबीनाच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते. नुकतीच देबीना पहिल्यांदाच आपल्या बिहारमधील सासरी गेली होती. त्यावेळी तिचे सासरच्या मंडळींनी जोरदार स्वागत केले. सासरी जाण्याचा सगळा प्रवास देबीनाने व्हिडिओमधून आपल्या यूट्यूब चॅनेलवर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये सासरी पोहोचून पहिल्या दिवसाच्या दिनचर्येपर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. (Debina Bonnerjee shares husband gurmeet ‘s house video)

या व्हिडिओमध्ये सासरी पोहोचल्यानंतर देबीनाच्या सासूने आरती ओवाळून देबीनाचे औक्षण केले. व्हिडिओमध्ये देबीनाचा पती गुरमीत चौधरीसुद्धा दिसत आहे. ज्यामध्ये तो “देबीना इथे पहिल्यांदाच आली आहे,” असे घरच्यांना सांगत आहे. यावेळी देबीनाच्या आगमनाने सासरची मंडळी मात्र जाम खुश झालेली पाहायला मिळत आहेत.

या व्हिडिओमध्ये देबीनाने घराचा हॉल आणि रूमसुद्धा दाखवल्या. घरात प्रवेश केल्यानंतर देबीना देवघरात जाऊन देवासमोर नतमस्तक झाल्याचे दिसून येत आहे. देबीनाच्या आगमनाने घरातील वातावरण बदलून गेल्याचेही दिसत आहे.

दरम्यान या व्हिडिओमध्ये देबीना आणि तिच्या सासूमध्ये असलेला जिव्हाळा प्रकर्षाने दिसून येत आहे. या वेळी व्हिडिओमध्ये ओळख करून देताना “या काकू माझ्या सासुबाई आहेत, म्हणत तुम्ही मला सासूसारखं ओरडायचं नाही,” असं देबीना बोलताना दिसत आहे. त्यानंतर सासूसोबत मोबाईलची स्क्रीन शेअर करत “विचार केला तर १९ वर्षांपासून आपण एकमेकांना ओळखतोय म्हणजे जवळजवळ दोन दशकांच नातं,” असे सांगताना देबीना सासूसोबत असलेलं खास नातं चाहत्यांना सांगत आहे.

या व्हिडिओला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला असून आतापर्यंत २ लाखांपेक्षाही अधिक चाहत्यांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-क्या बात है! सुनील शेट्टीचा मुलगा अहानच्या डेब्यू सिनेमाचा टिझर रिलीझ; तारा सुतारियासोबत करणार रोमान्स

-काय सांगता! ‘या’ भीतीमुळे भोजपुरी सुपरस्टार निरहुआ कधीच गेला नाही त्याच्या सासरवाडीत; स्वत:च केला खुलासा

-भर इव्हेंटमध्ये उघडली सोनम कपूरच्या शर्टची बटणं, कॅमेऱ्यात कैद झाला अभिनेत्रीचा ‘Oops Moment’

हे देखील वाचा