×

देबिना बॉनर्जीने ट्रोलर्सला दिले सणसणीत प्रत्युत्तर, बाळाला चुकीचे पकडल्याने झालती ट्रोल

टेलिव्हिजन अभिनेत्री देबिना बॉनर्जी (Debina Bonnerjee) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती रोज तिच्या बाळासोबतचे फोटो शेअर करत असते. देबिना सोशल मीडियावर खूप सक्रिय असल्याने, अनेकवेळा तिला ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागते. अभिनेत्री सध्या पुन्हा एकदा सोशल मीडिया युजर्सच्या निशाण्यावर आली आहे. खरं तर, नवजात बाळाला निष्काळजीपणे पकडल्याबद्दल ट्रोलर्सनी देबिनावर टीका केली. काही दिवसांपूर्वी देबिनाने एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये ती तिच्या मुलीला एका हातात धरून गाणे गाताना दिसत आहे.

देबिना आणि गुरमीत चौधरी (Gurmeet Choudhary) यांनी ३ एप्रिल रोजी त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत केले. त्यांनी त्यांच्या मुलीचे नाव लियाना ठेवले. रील पोस्ट केल्यानंतर तिच्या अनेक चाहत्यांनी तिचे कौतुक केले, तर काहींनी तिला ट्रोल देखील केले. एका युजरने लिहिले, “तुम्हाला माहित आहे की, तुमच्या बाळासाठी सर्वात चांगले काय आहे. परंतु अशा प्रकारे नवजात बाळाला पकडणे भयावह आहे आणि समस्या ही आहे की, आपल्याला आजकाल सर्वकाही शेअर करायचे असते.” तर दुसर्‍याने लिहिले, “तुम्ही एका बाळाला व्हिडिओसाठी कसे धरले आहे ते पहा.” (debina bonnerjee shuts down trolls slamming her for holding her baby carelessly)

View this post on Instagram

A post shared by Debina Bonnerjee (@debinabon)

देबिनाने ट्रोल करणाऱ्यांना दिले उत्तर
देबिनाने आता ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिले आहे. देबिना म्हणाली, “तुम्हाला खूप प्रश्न आहेत की, मी माझ्या बाळाला असे का धरून ठेवले? मी माझ्या सासूला आंटी का म्हणते आणि आई का नाही? आणखी काही प्रश्न? मी फक्त एवढेच म्हणेल की, माझ्या आजूबाजूल सुरक्षित लोकांची हातं आहेत, जे म्हणतात की, हे सर्व ठीक आहे.”

देबिनाने तिच्या कुटुंबासोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. अलीकडेच, देबिनाने तिचा पहिला मदर्स डे साजरा केला आणि तिच्या इंस्टाग्राम हँडलवर मोहक फोटो शेअर केले. अभिनेत्री लग्नाच्या तब्बल ११ वर्षांनंतर आई बनली आहे. त्यामुळे ती तिच्या मातृत्वाचा पुरेपूर आनंद घेताना दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post