बॉलिवूडमधील सर्वात रोमँटिक जोडप्यांपैकी एक म्हणजे रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण. मागील काही तासांपासून यांच्या काही फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. दीपिका आणि रणवीरच्या लग्नातील कधीही न पाहिलेले हे फोटो समोर आले आहेत. दीपिका आणि रणवीरने 2018 मध्ये इटलीमध्ये लग्न केले होते. त्यांच्या लग्नाला आता जवळपास 3 वर्ष पूर्ण होत आले आहेत. अशातच त्यांच्या लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Deepika Padukone and Ranveer Singh’s unseen wedding photos get viral)
या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, रणवीर आणि दीपिका दोघेही लग्नाच्या ड्रेसमध्ये आहेत. त्या दोघांच्याही हातात शँपेनचे ग्लास आहेत. दीपिका आणि रणवीरचे हे फोटो फॅन अकाऊंटवर शेअर केले आहेत. जे जोरदार व्हायरल होत आहेत.
या फोटोमध्ये दीपिकाने लाल रंगाची साडी आणि रणवीरने सोनेरी रंगाचा ड्रेस घातला आहे. हे फोटो पाहून असे समजते की, त्यांनी हे फोटो तेव्हा काढले आहेत, जेव्हा त्यांनी साऊथ इंडियन पद्धतीने लग्न केले. या जोडप्याने दोन पद्धतीने लग्न केले आहे. त्यांनी साऊथ इंडियन आणि शीख पद्धतीने लग्न केले आहे.
दीपिका आणि रणवीर बॉलिवूडमधील एक लोकप्रिय जोडपे आहे. त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडते. ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन त्या दोघांची जोडी सर्वांना खूप आवडते. रणवीर आणि दीपिकाने अनेक चित्रपटात काम केले आहे. त्यांनी ‘गोलियो की रास लीला: रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे.
दीपिका आणि रणवीर हे दोघेही त्याच्या ’83’ या चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट क्रिकेट या खेळावर आधारित असणार आहे. या चित्रपटात रणवीर कपिल देव यांचे पात्र निभवणार आहे, तर दीपिका त्यांची बायको रोमी देव यांचे पात्र निभावणार आहे. यासोबतच रणवीर ‘सर्कस’, ‘तख्त’ या चित्रपटात दिसणार आहे, तर दीपिका ‘फायटर’ आणि ‘द इंटर्न’ या चित्रपटात दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-आनंदाची बातमी! ‘खिलाडी’ अक्षय कुमारने केली नवीन मोबाईल गेमची घोषणा; सोशल मीडियावरून दिली माहिती
-‘ओ पिया’, म्हणत ‘शालू’ने शेअर केला व्हिडिओ; काळ्या साडीमध्ये पाहायला मिळाल्या वेड लावणाऱ्या अदा
-हॉट व्हिडिओ शेअर करत मराठमोळी ऋतुजा बागवे म्हणतेय, ‘…माझ्यात तो टॅलेंट नाही’