आनंदाची बातमी! ‘खिलाडी’ अक्षय कुमारने केली नवीन मोबाईल गेमची घोषणा; सोशल मीडियावरून दिली माहिती


बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आला आहे. त्याने रविवारी (२७ जून) आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चित्रपटाची नव्हे, तर एका मोबाईल गेमची घोषणा केली आहे. या बातमीने त्याचे चाहते भलतेच खुश झाले आहेत.

‘खिलाडी’ अक्षयने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत लिहिले की, “जेव्हा प्राणघातक लढायांमध्ये एफएयू- जी त्यांच्या दुश्मनांचा सामना करेल, तेव्हा बुलेट्स उडतील! बीटा रिलीझच्या एफएयू- जीच्या टीम डेथमॅच मोडमध्ये सामील व्हा. केवळ स्लॉट मर्यादित.” यासोबतच अक्षयने #BharatkeVeer असा हॅशटॅग देऊन विशाल गोंडल आणि एनकोर गेम्सलाही टॅग केले आहे.

यावर्षी जानेवारी महिन्यात अक्षय कुमारने भारताच्या ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने फिअरलेस आणि युनायटेड गार्ड्स- म्हणजेच (फौ- जी) ही मोबाईल ऍक्शन गेम लाँच केली होती.

ही गेम बेंगळुरू येथील एनकोर गेम्स स्टुडिओने बनवली आहे. विशेष म्हणजे या गेमची संकल्पना ही स्वत: अक्षय कुमारची आहे. ही गेम गुगल प्ले आणि ऍपल ऍप स्टोरवर उपलब्ध आहे.

सर्वप्रथम या गेमची घोषणा अक्षयने पब- जी गेमवर बंदी घातल्यानंतर सप्टेंबर २०२० मध्ये केली होती.

या गेमची घोषणा करताना अक्षयने ट्वीट केले होते की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर चळवळीस पाठिंबा, एक ऍक्शन गेम सादर केल्याचा अभिमान, फिअरलेस आणि युनायटेड- गार्ड्स एफएयू-जी. मनोरंजनाव्यतिरिक्त खेळाडू आपल्या सैनिकांच्या बलिदानाबद्दलही शिकतील. मिळवलेल्या निव्वळ उत्पन्नाच्या 20 टक्के रक्कम भारतकेवीर ट्रस्टमध्ये दान केली जाईल.” यासोबतच अक्षयने #FAUG असा हॅशटॅगही वापरला होता.

अक्षय हा बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता आहे. त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात सन १९९१ मध्ये ‘सौगंध’ चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून केली होती. यानंतर त्याने ‘गुड न्यूज’, ‘मिशन मंगल’, ‘हाऊसफुल’, ‘हाऊसफुल ४’, ‘केसरी’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे. आता तो ‘अतरंगी रे’, ‘बेल बॉटम’, ‘सूर्यवंशी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ओ पिया’, म्हणत ‘शालू’ने शेअर केला व्हिडिओ; काळ्या साडीमध्ये पाहायला मिळाल्या वेड लावणाऱ्या अदा

-हॉट व्हिडिओ शेअर करत मराठमोळी ऋतुजा बागवे म्हणतेय, ‘…माझ्यात तो टॅलेंट नाही’

‘क्रेझी किया रे’, प्रिया बापटच्या दिलखुलास स्मितवर चाहते झाले फिदा


Leave A Reply

Your email address will not be published.