‘पठाण’च्या सेटवरून दीपिका पदुकोणचे बोल्ड बिकिनी फोटो व्हायरल, सेटवर चिल करताना दिसली मस्तानी

प्रत्येक निर्माता दिग्दर्शक आपल्या शूटिंग सुरु असलेल्या सिनेमाची माहिती, फोटो, बाहेर लीक होऊ नये याची पुरेपूर काळजी घेत असतो. कधी कधी तर सेटवर मोबाइल फोनला देखील बंदी घातली जाते. मात्र एवढी काळजी घेऊनही कुठेतरी काहीतरी चुकते आणि सेटवरील काही फोटो लीक होतात. आता नुकतेच शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित अशा ‘पठाण’ चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो नुकतेच व्हायरल झाले आहेत. सध्या या सिनेमा तुफान चर्चेत असून, सिनेमातील शाहरुख आणि दीपिकाच्या लूकचे फोटो काही दिवसांपूर्वीच व्हायरल झाले होते. आता या सिनेमातील दीपिका पदुकोणचे काही बोल्ड फोटो समोर आले आहेत.

सध्या ‘पठाण’ सिनेमाची स्पेनमध्ये शूटिंग सुरु असून, शाहरुख खानचे सेटवरील काही शर्टलेस फोटो समोर आले होते. आता दीपिका पदुकोणचे काही बोल्ड बिकिनी फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, या फोटोंमध्ये ती कमालीची आकर्षक दिसत आहे. तिच्या या फोटोंमध्ये तिने पिवळ्या रंगाची बिकिनी घातली असून यात ती कॉन्फिडंट होऊन सेटवर फिरताना दिसत आहे. दीपिकाचा हा हॉट सिझलिंग अवतार सर्वानाच आवडत असून, तिचे हे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by [email protected] (@samthebestest_)

सध्या दीपिका, शाहरुख आणि जॉन त्यांच्या आगामी ‘पठाण’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून, याच महिन्यात चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. हा सिनेमा २५ जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. प्राप्त माहितीनुसार या चित्रपटात सलमान खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या सिनेमात शाहरुख आणि दीपिका चौथ्यांदा एकत्र काम करताना दिसणार आहे. याआधी ते ओम शांती ओम, चेन्नई एक्सप्रेस आणि हॅप्पी न्यू इयर या चित्रपटांमध्ये एकत्र दिसले होते.

View this post on Instagram

A post shared by CineRiser (@cineriserofficial)

नुकताच दीपिकाचा अमेझॉन प्राईमवर ‘गेहरएया’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात तिच्या आणि सिद्धांत चतुर्वेदींच्या बोल्ड सीन्समुळे ती खूपच चर्चेत आली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

Latest Post