Wednesday, March 4, 2026
Home बॉलीवूड दीपिकाच्या सावलीसारखा सोबत असतो तिचा हा बॉडीगार्ड, मन मोठ्ठं करून देते तब्बल ‘इतका’ पगार

दीपिकाच्या सावलीसारखा सोबत असतो तिचा हा बॉडीगार्ड, मन मोठ्ठं करून देते तब्बल ‘इतका’ पगार

अभिनेत्री दीपिका पदुकोण बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये हे स्थान मिळवले आहे. त्याचबरोबर तिची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. ती जिथे जाते, तिथे तिला पाहण्यासाठी चाहत्यांची तुडुंब गर्दी असते. अशा स्थितीत तिला कोणत्याही वाईट घटनेपासून वाचवण्यासाठी तुम्ही तिच्या भोवती काळ्या सफारी सूटमध्ये काही लोकांना पाहिले असेल, हे तिचे अंगरक्षक आहेत. दीपिका पदुकोणच्या वैयक्तिक अंगरक्षकाचे नाव जलाल असे आहे. दीपिका जलालला तिच्या भावासारखा मानते. पगाराच्या बाबतीतही ती कधी कमीपणा दाखवत नाही.

दीपिका जलालला मानते तिचा भाऊ
अभिनेत्री दीपिका पदुकोण जलालवर खूप विश्वास ठेवते. चित्रपटांच्या शूटिंगपासून ते सर्व प्रमोशन आणि येण्या-जाण्यापर्यंत जलाल नेहमी सावली सारखा तिच्यासोबत असतो. तो दीपिकाला प्रत्येक धोक्यापासून वाचवतो. दीपिकाही जलालला तिच्या भावासारखीच वागवते. इतकेच नव्हे तर दीपिका दरवर्षी जलालला राखी देखील बांधते. जलाल हा गेली अनेक वर्ष दीपिकाचा अंगरक्षक आहे. तो दीपिकाच्या नेहमी सोबत असतो. याचा एक प्रत्यय म्हणजे, दीपिकाचे लग्न इटलीमध्ये झाले होते. तेव्हा कदाचित तिचे नातेवाईक तिच्या लग्नासाठी इटलीला पोहोचले असतील किंवा नसतील. पण जलाल हा आधीच वधू पक्षाकडून पोहोचला होता. (Deepika’s shadow is like her bodyguard, her salary makes her mind big)

जलालला वर्षाला मिळतो ‘इतका’ पगार
अभिनेत्री दीपिका पदुकोण जलालला किती पगार देत असेल? याची प्रत्यक्ष आकडेवारी कधीच समोर आलेली नाही. पण दोन-तीन वर्षांपूर्वी असे अहवाल दिसले होते की, दीपिका जलालला वर्षाला ८० लाख रुपये पगार देते. त्यानुसार, त्याला दर महिना सुमारे ६.५ लाख रुपये पगार देते. मात्र ही माहिती काही वर्ष जुनी आहे. पण जर यामध्ये अजून वाढ झाली असेल, तर आता दीपिका त्याला जवळजवळ एक कोटी रुपयांपर्यंत पगार देत असेल. असा अंदाज वर्तवला जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘राधा कैसे ना जले…’, म्हणत ‘धकधक गर्ल’ने पुन्हा एकदा चुकवला चाहत्यांचा काळजाचा ठोका

-‘या’ कलाकारांनी किस करून लावली होती पडद्यावर आग; आमिर अन् करिश्माचाही आहे समावेश

-‘दिल को करार आया!’ तुझ्यात जीव रंगला फेम ‘वहिनीसाहेबां’चे एक्सप्रेशन्स पाहुन चाहते झाले पुरते घायाळ

हे देखील वाचा