Tuesday, April 23, 2024

‘डिलिव्हरी बॉय’ चित्रपटाच्या पहिल्या गाण्याची डिलिव्हरी ‘भाऊचा नादखुळा’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

काही दिवसांपूर्वीच ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाचे एक भन्नाट पोस्टर आणि टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आले. सोशल मीडियावर झळकलेल्या पोस्टर आणि टीझरला काही दिवसातच लाखो प्रेक्षकांची पसंती मिळत असतानाच आता या चित्रपटातील पहिले भन्नाट गाणे प्रदर्शित झाले आहे. ‘भाऊचा नादखुळा’ असे बोल असलेले हे गाणे प्रथमेश परब आणि पृथ्वीक प्रतापवर चित्रित करण्यात आले आहे. एनर्जीने भरलेल्या या गाण्यातील दोघांची हूक स्टेप आता अवघ्या महाराष्ट्राला नाद लावणार आहे.

एल. के. लक्ष्मीकांत यांनी त्यांच्या जबरदस्त आवाजात हे गाणे गायले असून या गाण्याला संगीत देखील त्यांचेच आहे. तर राम खाटमोडे यांनी शब्दबद्ध केलेल्या या धमाल गाण्याचे नृत्य दिग्दर्शन जित सिंग यांनी केले आहे. हा चित्रपट ९ फेब्रुवारीला आपल्या सगळ्यांचे मनोरंजन करायला येणार आहे.

https://bit.ly/BhauChaNaadSong

सिनेपोलिस आणि दीपा नायक प्रस्तुत, लुसिया एंटरटेनमेंट प्रोडक्शन्स निर्मित ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाचे डेव्हिड नादर निर्माते आहेत तर फेलिक्स नादर, विकास श्रीवास्तव, विकास सिंग, राझ धाकड आणि ऋषिकेश पांडे सहनिर्माते आहेत. मोहसीन खान दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी केले असून यात प्रथमेश परब, पृथ्वीक प्रताप आणि अंकिता लांडे पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

या गाण्याबद्दल एल. के. लक्ष्मीकांत म्हणतात, ” ‘भाऊचा नादखुळा’ हे एनर्जेटिक गाणे प्रत्येकाला ऐकायला आणि पाहायला आवडेल असे आहे. या गाण्याचे गीत इतके हॅपनिंग आहे की गाताना माझेही पाय थिरकत होते. त्यामुळे मला असे वाटते आता या गाण्यावर संपूर्ण महाराष्ट्र थिरकणार आहे.”

याबद्दल दिग्दर्शक मोहसीन खान म्हणतात, “डिलिव्हरी बॉय या चित्रपटाचे पहिले गाणे ‘भाऊचा नादखुळा’ माझ्या प्रत्येक तरुणांना आवडेल असे आहे. या कलरफुल गाण्यात धमाल आहे, मजा आहे. समारंभांमध्ये दणक्यात वाजेल, असे हे गाणे आहे.’’

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘तू गेल्यावर वाटलं स्वतःला मारून टाकावं’ अवधूत गुप्तेने कोणासाठी केली भावनिक पोस्ट? सोशल मीडियावर उडाली खळबळ
ठरलं तर! ‘हे’ बॉलीवूड सेलीब्रेटी करणार आयोध्या वारी, घेणार प्रभू रामचंद्रांचे दर्शन

हे देखील वाचा