Thursday, April 18, 2024

‘तू गेल्यावर वाटलं स्वतःला मारून टाकावं’ अवधूत गुप्तेने कोणासाठी केली भावनिक पोस्ट? सोशल मीडियावर उडाली खळबळ

गायक अवधूत गुप्ते यांनी त्याच्या आवाजाने सगळ्यांचे मनोरंजन केले आहे. आणि प्रेक्षकांच्या मनात त्याच्या आवाजाची एक वेगळीच जादू आजही पाहिला मिळते. अवधूत गुप्तेची अनेक गाणी सुपरहिट झालेली आहेत. त्याचप्रमाणे अवधूत एक संगीतकार देखील आहे. त्यांनी अनेक गाणी देखील लिहिलेली आहे. त्याच्या गाण्यांचे अनेक चाहते आहेत. अवधूत सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. त्याच्या गाण्याची अपडेट तसेच वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी तो त्याच्या सोशल मीडियावरू त्याच्या चाहत्यांना देत असतो.

आता देखील अवधूत गुप्त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. आणि त्या पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलेले आहे. त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि त्याला कॅप्शन दिले आहे की, ” प्रीय जान.. जानू .. जानेश्वरी.. तू सोडून गेल्यावर खूप रडलो.. पडलो .. धडपडलो..आधी वाटलं स्वतःला मारून टाकावं .. पण नंतर वाटलं की तू जशी ‘मारून‘ गेलीस.. त्या नंतर स्वतः च स्वतःला काय मारायचं?mलवचा खंजीर छातीत घुसला की कुणाचं रक्त निघतं आणि कुणाची गाणी! ही बघ माझी गाणी.. एक अल्बम , चार गाणी .. प्रत्येक गाणं.. एका तुटलेल्या हार्टची कहाणी! इशय हार्ड हाय.. कारन इशय ‘हार्ट‘ हाय! बग.. माझी आठवण येते का..”

अशाप्रकारे अवधूतची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. अवधूतने ही पोस्ट त्याच्या नवीन अल्बमसाठी केली आहे. विश्वमित्र असं त्याच्या नव्या अल्बमचं नाव असणार आहे. याचा प्रोमो सोशल मीडियावर देखील शेअर केलेला आहे. आता अनेक चाहते त्याला त्याच्या नवीन अल्बमसाठी शुभेच्छा देत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

ठरलं तर! ‘हे’ बॉलीवूड सेलीब्रेटी करणार आयोध्या वारी, घेणार प्रभू रामचंद्रांचे दर्शन
‘झिम्मा २’चे चित्रपटगृहात अर्धशतक; हेमंत ढोमे म्हणाला, ‘हा प्रवास एखाद्या जादूपेक्षा कमी नव्हता’

हे देखील वाचा