देवमाणूस , लागिर झालं जी या प्रसिद्ध मालिकांमधून समोर आलेला अभिनेता किरण गायकवाड (kiran Gaikwad) आता दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. चित्रपटाचे नाव “एफ.आय.आर. नंबर 469″ असून, नुकतेच मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार यांच्या उपस्थितीत या चित्रपटाचा टीझर पोस्टर लॉन्च करण्यात आला आहे. एफ.आय.आर. नंबर 469” या चित्रपटाची निर्मिती बिग ब्रेन प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली निलेश राठी, प्राची राऊत, आणि सचिन अगरवाल यांनी केली आहे.
चित्रपटात प्रमुख भूमिकेत अभिनेता प्रसाद ओक, नचिकेत पूर्णपात्रे, आणि अभिनेत्री अमृता धोंगडे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. येत्या सप्टेंबर महिन्यात चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होणार आहे.
अभिनेता म्हणून किरण गायकवाडने आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने निवडलेल्या मालिका, चित्रपटांतून त्याचा अभिनेता म्हणून असलेला वेगळेपणा दिसतो. त्यामुळे आता दिग्दर्शन म्हणून पदार्पण करताना त्याने चित्रपटासाठी निवडलेला विषय काय, या बाबत चित्रपटप्रेमी मध्ये उत्सुकता वाढली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
अभिनेता आयुष्यमान खुराना साजरा करतोय स्वातंत्र्यदिन; स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी आपणही योगदान दिले पाहिजे…
नोव्हेंबर पासून राणा सुरु करणार नव्या चित्रपटाची शूटिंग; यावेळी दिसणार एका हॉरर चित्रपटात…