‘साथ निभाना साथिया’ मधून घराघरात पोहोचलेली ‘गोपी बहू’ म्हणजेच देवोलीना भट्टाचार्जी सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. मालिकेतील तिच्या अभिनयाचे नेहमी कौतुक होत असते. नुकतेच देवोलीना एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी कार्यक्रमादरम्यान ती भावुक झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे तिचे चाहते मात्र चिंतेत पडले आहेत.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जिनिलिया देशमुख यांचा टीव्ही कार्यक्रम ‘लेडिज वर्सेस जेंटलमनच्या’ दुसर्या पर्वाला सुरुवात होत आहे. नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो समोर आला होता, ज्यामध्ये देवोलीना भट्टाचार्जी सहभागी झाली होती. कार्यक्रमात बोलताना मध्येच देवोलीना भावुक झालेली पाहायला मिळाली. इतकेच नव्हे, तर तिला अश्रूही अनावर झाले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. त्यावर अनेक चाहत्यांनी चिंता व्यक्त करत देवोलीनाला भावुक होण्याच कारण विचारले आहे.
This meltdown melted our hearts! ♥️
For the full story, watch Ladies v/s Gentlemen Season 2, streaming for FREE on your #FlipkartApp.@Devoleena_23 @jasminbhasin @riteishd @geneliad pic.twitter.com/SHGhfgQqoV
— Flipkart Video (@FlipkartVideo) October 18, 2021
या व्हायरल व्हिडिओमध्ये देवोलीना ‘लेडिज वर्सेस जेंटलमन’ कार्यक्रमात सहभागी झाल्याच दिसून येत आहे. यावेळी उदास दिसणार्या देवोलीनाला जेनेलियाने ‘तुम्ही ठीक आहात का?’ असे विचारताच ती भावुक होऊन रडू लागल्याचे दिसत आहे. या व्हिडिओमुळे देवोलीनाच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
दरम्यान, देवोलीना भट्टाचार्जीने स्टार प्लसवरील ‘साथ निभाना साथिया’ मालिकेतून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. या मालिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. अनेक वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. या मालिकेनंतर देवोलीना टीव्हीपासून बराच काळ दूर होती. ती ‘बिग बॉस 13’मध्येही सहभागी झाली होती, परंतु पाठदुखीमुळे तिला मध्येच हा कार्यक्रम सोडावा लागला.
अलीकडे ‘बिग बॉस 14’ मध्येही ती सहभागी झाली होती. यावेळी तिने कणखर भूमिका घेत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. यामुळेच ती या कार्यक्रमात प्रमुख स्पर्धक बनून समोर आली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अमृता राव आणि आरजे अनमोल पहिल्यांदाच शेअर करणार त्यांची ‘विवाह’पर्यंत पोहचलेली अनोखी प्रेमकहाणी