Saturday, July 6, 2024

व्हि़डिओ: युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने स्वतःच्याच गाण्यावर धमाकेदार डान्स करत पुन्हा दाखवला आपला जलवा

भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा ही काही दिवसांपूर्वीच पंजाबी गायक जस्सी गिलसोबत एका गाण्यात दिसली होती. तसेच यात ती जोरदार डान्स करताना दिसली. ‘ओये होये होये’ असे या गाण्याचे नाव आहे. हे गाणे जस्सी गिल आणि सिमर कौर यांनी गायले आहे.

धनश्री वर्मा डॉक्टरसह एक कोरिओग्राफर आहे. सोशल मीडियावर अनेकदा धनश्री तिचे फोटो आणि डान्स व्हिडिओ पोस्ट करून चाहत्यांचे लक्ष वेधत असते. तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपण पाहिले, तर असे खूप डान्स व्हिडिओ आपल्याला तिथे दिसतील.

जस्सी गिल आणि धनश्री वर्मा यांच्या ‘ओये होये होये’ या गाण्याने चाहत्यांना नाचण्यास भाग पाडले होते. नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये धनश्री स्वतःच्याच गाण्यावर नाचताना दिसली आहे. डेनिम जीन्स आणि ब्लॅक टी-शर्ट परिधान करून ती गाण्यावर जोरादर थिरकली आहे. व्हिडिओमधील धनश्रीची स्टाईल खूपच पसंत केली जात आहे. चाहतेही व्हिडिओखाली कमेंट्स करून प्रतिक्रिया देत आहेत.

या गाण्याला एका मोठ्या सेटवर शूट करण्यात आले असून, अरविंद खैरा यांनी हे गाणे दिग्दर्शित केले आहे.

धनश्री वर्माने 22 डिसेंबर, 2020 रोजी चहलशी लग्नगाठ बांधली. चहल आणि धनश्री यांनी मागच्या वर्षी 8 ऑगस्ट रोजी कोरोनाच्या काळात साखरपुडा केला होता. दोघांनीही लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना याबद्दल माहिती दिली.

आजकाल धनश्री वर्मा मालदीवमध्ये आपली सुट्टी घालवत आहेत. धनश्री मालदीवमधून तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर बरेच फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. धनश्रीच्या या फोटोंना चाहत्यांकडून बरेच प्रेमही मिळते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सुपरस्टार महेश बाबूच्या ‘या’ सिनेमाचा टिझर रिलीझ, चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या उत्सुकतेने गाठले शिखर

-अगं बाई मोडशील ना!! डोक्यावर उभे राहून मलायकाने केला प्रेक्षकांना नमस्कार

-अभिनेत्रीने शेअर केला बोल्ड डान्स व्हिडिओ; ‘या’ भितीपोटी बंद केला कमेंटचा पर्याय

हे देखील वाचा