Friday, April 18, 2025
Home साऊथ सिनेमा अरे व्वा! धनुष आणि ऐश्वर्याने घटस्फोटाचा निर्णय घेतला मागे? हैद्राबादमध्ये एकाच हॉटेलमध्ये झाले कैद

अरे व्वा! धनुष आणि ऐश्वर्याने घटस्फोटाचा निर्णय घेतला मागे? हैद्राबादमध्ये एकाच हॉटेलमध्ये झाले कैद

नुकतेच काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष आणि ऐश्वर्याने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांच्या चाहत्यांना ही बातमी दिली. त्यांच्या नात्याला अठरा वर्ष पूर्ण झाली होती, तरीही त्यांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. अशातच अशी बातमी येते की, रामोजी फिल्म सिटीमध्ये ते एकाच हॉटेलमध्ये थांबले आहेत. परंतु खरंतर ते आपल्या वेगवेगळ्या कारणामुळे शूटिंग संदर्भात हॉटेलमध्ये थांबले आहेत.

रामोजी फिल्म सिटीमध्ये सितारा हॉटेलमध्ये हे दोघे थांबले आहेत. परंतु हे दोघे आपापल्या वेगवेगळ्या कारणामुळे त्या एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. ऐश्वर्या आपल्या येणाऱ्या आगामी व्हिडिओ सॉंगसाठी दिग्दर्शन करत आहे.  त्याच कारणामुळे ती तिथे आली आहे. ती दिग्दर्शित करत असलेलं गाणं हे ‘व्हॅलेंटाईन डे’ वर आहे. हे पूर्ण गाणं तीन दिवसात शूट केलं जाणार आहे. तर धनुष आपल्या येणाऱ्या आगामी सिनेमाच्या शूटिंग निमित्ताने रामोजी फिल्म सिटीमध्ये गेला होता. (dhanush and aishwarya stay in same hotel in haidrabad)

त्यावेळी तोही नेमका सितारा या हॉटेलमध्ये थांबला होता.  दोघांच्या घटस्फोटानंतर दोघेही आपापल्या कामांमध्ये व्यस्त आहेत. आणि दोघांनीही हा सामंजस्याने घेतलेला निर्णय आहे. अजून तरी दोघांच्या एकत्र येण्याची कोणतीही बातमी कळलेली नाही. हे दोघं चित्रीकरणाच्या निमित्ताने रामोजी फिल्म सिटीमधील सितारा हॉटेलमध्ये थांबले होते ही बातमी समोर आली.

ऐश्वर्या ही दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी आहे. धनुष आणि ऐश्वर्याचा प्रेम विवाह झाला आहे. अगदी थाटामाटात त्यांचा विवाह झाला होता. त्या दोघांना दोन मुले आहेत. त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतल्याने त्यांच्या चाहत्यांना खूप दुःख झाले आहे.

हेही वाचा :

अभिनेत्री जान्हवी कपूरच्या मोनोकनीतील लूकने सोशल मीडियावर लावली आग

अभिनेता अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा रेड्डी देते मोठ्या अभिनेत्रींना टक्कर, जगते आलिशान आयुष्य

‘ये काली काली आंखे’ गाण्यावरील दिशा पटानीचा धमाकेदार डान्स आणि हॉट मूव्ह्ज पाहून चाहते झाले घायाळ

 

हे देखील वाचा