Monday, June 24, 2024

मुलगा असावा तर असा! ‘या’ सुपरस्टारने आईवडिलांना भेट म्हणून दिले तब्बल १५० कोटींचे आलिशान घर

दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष सध्या त्याच्या आगामी ‘वाथी’ सिनेमामुळे तुफान चर्चेत आहे. हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र यासोबतच तो आता नवीन एका कारणामुळे चर्चेत आला आहे. धनुषने आता चेन्नईमध्ये एक आलिशान घर खरेदी केले आहे. याच कारणामुळे सध्या तो मोठ्या प्रमाणावर लाइमलाईट्मधे आला आहे. त्याने चेन्नईमधील पोएस गार्डनजवळ घर घेतले असून, ते घर त्याने त्याच्या आईवडिलांना भेट म्हणून दिले आहे. ते सर्व कुटुंब या नवीन घरात शिफ्ट देखील झाले आहे.

दिग्दर्शक सुब्रमण्यम शिवा यांनी धनुषच्या या नव्या घराबद्दल माहिती दिली आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांनी या घराबद्दल सांगितले. सुब्रमण्यम शिवा यांनी हे फोटो शेअर करत लिहिले, “माझा लहान भाऊ धनुषचे नवीन घर. हे घर मंदिराप्रमाणे समाधान देत आहे. धनुषने त्याच्या जीवनात त्याच्या आईवडिलांना स्वर्गाप्रमाणे घर भेट म्हणून दिले आहे. अजून तुला अधिक यश आणि विविध उपलब्धी मिळो. तुला दीर्घायुष्य लाभो आणि तू आईवडिलांच्या सन्मानासाठी आजच्या तरुणांचे आदर्श बनून राहा.”

सोशल मीडियावर धनुषच्या या नवीन घराचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोंमध्ये धनुष त्याचा आईवडिलांसोबत दिसत असून आनंदी दिसत आहे. यात त्याने निळ्या रंगाचा कुर्ता आणि लांब केस आणि दाढी मध्ये दिसत आहे. त्याचा हा लूक त्याला सूट होत असून त्याच्या लूकचे देखील खूप कौतुक केले जात आहे. त्याच्या घराबद्दल देखील फॅन्स त्याला शुभेच्छा देत असून, आईवडिलांबद्दल त्याचे प्रेम पाहून त्याचे कौतुक देखील करत आहे. या घरची किंमत जवळपास १५० कोटींची असल्याचे सांगितले जात आहे.

धनुषच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर तो लवकरच ‘कॅप्टन मिलर’ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तो प्रियंका अरुल मोहन, शिव राजकुमार यांच्यासोबत दिसणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मोठी बातमी : कन्नड चित्रपट दिग्दर्शक एसके भगवान यांना देवाज्ञा
जेव्हा अन्नू कपूर यांच्यासोबत इंटिमेट सीन द्यायला प्रियांका चोप्राने दिला नकार, पाहा काय म्हणाला अभिनेता

हे देखील वाचा