Tuesday, June 18, 2024

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटाच्या सेटवरच फोटो शेअर करताना धर्मेंद्र झाले भावुक, म्हणाले…

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते असलेले धर्मेंद्र मागील बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून लांब आहे. मात्र तरीही ते सोसहल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या फॅन्सच्या सतत संपर्कात आहे. त्यांच्या फार्म हाऊसवरील विविध फोटो, व्हिडिओ ते शेअर करतात शिवाय इंडस्ट्रीमधील त्यांच्या जुन्या आठवणींना देखील उजाळा देताना ते दिसतात. धर्मेंद्र यांच्या चाहत्यांना लवकरच त्यांना चित्रपटात पाहता येणार आहे. करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमात ते अभिनय करताना दिसणार आहे. या चित्रपटात ते महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

नुकतेच धर्मेंद्र यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून करण जोहरच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ सेटवरचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट दिसत आहे. शबाना आझमी, धर्मेंद्र, आलिया भट्ट, रणवीर सिंग आणि करण जोहर या फोटोमध्ये दिसत आहे. मात्र या फोटोमध्ये जया बच्चन दिसत नाहीये. धर्मेंद्र यांनी हा फोटो पोस्ट केल्यानंतर काही काळातच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो पोस्ट करताना धर्मेंद्र यांनी एक भावनिक कॅप्शन देखील लिहिले आहे. त्यांनी लिहिले, “मित्रांनो प्रेम, इज्जत सर्वांकडून इतके मिळाले..लक्षातच आले नाही की, मी नवीन युनिटसोबत काम करत आहे.”

हा फोटो दिल्ली येथील असून सध्या चित्रपटाचे दिल्लीमध्ये शूटिंग सुरू आहे. हा फोटो कुतुबमिनार कॉम्प्लेक्समध्ये काढला गेला आहे. यात धर्मेंद्र यांनी पांढऱ्या रंगाचे स्वेटर, गळ्यात स्कार्फ आणि काळ्या रंगाची पँट डोक्यावर हॅट घातली आहे. तर आलिया पांढऱ्या आणि लाल रंगच्या साडीमध्ये, शबाना आझमी पांढऱ्या रंगाच्या साडीत अतिशय सुंदर दिसत आहे. रणवीर सिंगने देखील पांढऱ्या रंगाचेच जॅकेट आणि पँट घातली असून, करण जोहर मालती कलरच्या जॅकेट आणि पँटमध्ये दिसत आहे.

या फोटोमध्ये सर्वच खूप आनंदी आणि मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहेत. सोशल मीडियावरही या फोटोवर नेटकरी भरभरून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करताना दिसत आहे. जवळपास १ लाखांपेक्षा अधिक लाईक्स या फोटोला आले आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ सेट्वरुन अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट १० फेब्रुवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. करण जोहरने सोशल मीडियाच्या माध्यमातून याची घोषणा केली होती. या सिनेमामुळे करण ७ वर्षांनी दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘दिलबर गर्ल’ नोरा फतेही आता प्रियांका चोप्राच्या पतीसोबत लावणार ठुमके, मिळाली ‘ही’ आंतरराष्ट्रीय संधी

-जीवे मारण्याची धमकी मिळताच कंगना रणौतने वादामध्ये ओढलं सोनिया गांधींचं नाव, म्हणाली, ‘जीव देईन, पण…’

-‘गॅंग्स ऑफ वासेपुर’ फेम अभिनेत्याने उरकून टाकले लग्न, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला आनंदाचा धक्का!

हे देखील वाचा