‘मी लता दीदींना सरस्वती मातेचा दर्जा दिलाय’, धर्मेंद्र यांनी सांगितले त्यांच्या आयुष्यातील गाणसम्राज्ञींचे स्थान

Dharmendra was depressed, Singer lata Mangeshkar call and make him stressless


बॉलिवूडमधील सुपरस्टार धर्मेंद्र आज भलेही जगासाठी एक मोठे स्टार असतील. पण ते नेहमीच एक साधारण आयुष्य जगले आहेत. सगळ्यांचे मन जिंकण्यासाठी आणि त्यांचे प्रेम मिळवण्यासाठीच धर्मेंद्र यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी प्रेम मिळवले. प्रेक्षकांच्या याच प्रेमाची झलक धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यामुळे सगळ्यांना त्यांची खूपच चिंता वाटायला लागली आहे. गाणकोकिळा आणि गाणसम्राज्ञी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांना देखील त्यांची खूपच चिंता वाटायला लागली आहे. त्यांनी धर्मेंद्र यांना फोन करून त्यांची चौकशी देखील केली आहे.

लता दीदींनी धर्मेंद्र यांना कॉल केला. त्या धर्मेंद्र यांच्यासोबत 20 मिनिटे बोलत होत्या. त्यांनी धर्मेंद्र यांच्या तब्येतीची चौकशी केली. या गोष्टीचा खुलासा स्वत: धर्मेंद्र यांनी एका मुलाखतीमध्ये केला होता. त्यांनी सांगितले की, “लता दीदींनी त्यावेळी मला कॉल करून माझी चौकशी केली. त्यानंतर मला असे वाटले, जसे काय माझ्या सर्व समस्या आता नाहीश्या झाल्या आहेत. लता दीदी मला म्हणाल्या की, ‘डिप्रेस्ड होतील तुझे दुश्मन.'”

यानंतर धर्मेंद्रने जुन्या दिवसांना उजाळा देत असे सांगितले की, “लता दीदी माझा जीव आहेत, आमच्या नात्यात कधीच कोणत्या अटी नसतात. आम्ही रोज गप्पा मारायचो. मला त्या एवढ्या आवडतात की, मी त्यांना सरस्वती मातेचा दर्जा दिला आहे. जेव्हा संपूर्ण देशात लॉकडाऊन झाले, तेव्हा त्यांची गाणी ऐकून माझ्या मनाला खूप समाधान मिळत असे. त्यांनी नेहमी आनंदात राहावं एवढीच माझी इच्छा आहे.”

यासोबत त्यांनी ट्वीट देखील केले आहे. त्यात त्यांनी असे लिहिले आहे की, ‘शरुर नहीं आया सादगी को मेरी.. उम्र भर मे सहता आया.. बस सहता ही आया.’

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-संगीतकाराने भावाच्या नावालाच बनवले आपले आडनाव, म्हणाला ‘माझं नाव साजिद वाजिद असं आहे आणि…’

-‘या’ कारणामुळे राजपाल यादवला खावी लागली होती ‘जेलची हवा!’ तुरूंगातही वाजवला आपल्या विनोदी अंदाजाचा डंका

-बनायचे होते अभिनेता, पण ‘मला संधीच मिळाली नाही’ म्हणत गायकाने केला अपूर्ण स्वप्नाचा खुलासा


Leave A Reply

Your email address will not be published.