Thursday, March 28, 2024

‘धोंडी चंप्याची लव्हस्टोरी’ पाहूण व्हाल लोटपोट, भरत जाधव नवीन चित्रपट

मराठी इंडस्ट्रीमध्ये नुकतांच नवीन चित्रपट ‘धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचं नाव एकूणच तुमच्या चेहऱ्यावर हसू आले असेल, कारण चित्रपटच कॉमेडी विद लव्ह स्टोरीचा आहे. यामध्ये एक आगळीवेगळी प्रेमकथा दर्शवली असून दोन व्यक्तींसोबतच म्हैस आणि रेड्याची देखिल लव्हस्टोरी सांगण्यात आली आहे. नुकतांच टचित्रपटाचा ट्रेलर सोशल प्रदर्शित करण्यात आला आहे.

धोंडीं चंप्या: एक प्रेम कथा (Dhondi Champya) ही एक अशी कथा आहे, ज्यामध्ये व्यक्तीच्या प्रेमासोबतच म्हैस आणि रेड्याची देखिल लव्हस्टोरी देखिल दाखवण्यात आली आहे. या आगळ्यावेगळ्या प्रेम काहाणीमध्ये कॉमेडीचा तडका लावण्यासाठी मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कॉमेडियन अभिनेता भरत जाधव (Bharat Jadhav), प्रभाकर मोरे (Prabhakar More), आणि वैभव मांगले (Vaibhav Mangle) मुख्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला असून प्रेक्षकांना चांगलाच पसंतीस उतरेल. (dhondi champya marathi movie trailer released bharat jadhav vaibhav mangale prabhakar on main character )

या चित्रपटामध्ये धोंडी आणि चंप्या नावाची मुलं दाखवली असून त्यांचे वडील एकमेकांचे कट्टर वैरी दाखवली आहेत. कट्टर वैरी असलेल्या भरत जाधव आणि वैभव मांगले यांची म्हैस आणि रेड्या एकमेकांच्या प्रेमता पडतात. मात्र, त्यांचे प्रेम त्यांच्या मालकाला अमान्य असेत, त्यामुळे यांचे प्रेम यशस्वी होऊ द्यायचे का नाही यावरुन आख्या गावामध्ये खळबळ सुरु होते. प्राण्यांसोबतच त्यांची मुलं देखिल एकमेकांच्या प्रेमात पडतात. प्राणी प्रेमात पडल्यामुळे ही दोघे पैक्के वैरी एकमेकांचा जिव घेण्यास निघतात, जर त्यांना समजले की, त्यांची मुलंदेखिल प्रेमात आहेत. तेव्हा काय होईल हे चित्रपटामध्येच उलगडणार आहे.

bharat jadhav

हा चित्रपट रिलायन्स एंटरटेनमेंट द्वारे सुनील जैन आणि कल्ट डिजिटल यांच्या सहकार्याने सप्रस्तुत होत आहे. चित्रपाटाची निर्मिती फिफ्थ डायमेन्शन कल्ट डिजिटल यांनी केली असून दिग्दर्शन ज्ञानेश भालेकर यांनी केले आहे. प्रभाकर गोगले यांच्या कथेला प्रेरणा घेऊन हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. धोंड्या चंप्या हा चित्रपट पुर्णपणे कॉमेडीने भरलेला असून (दि, 16 डिसेंबर) रोजी चित्रपटगृहामध्ये पाहायला मिळणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘काळी राणी’ नव्या नाटकासहित नाट्यकारकिर्दीची यशस्वी शतकी खेळी
‘मला काहीच फरक पडत नाही…’, अर्जुन कपूरसोबत नात्याबद्दल मलायका अरोराचे मोठे वक्तव्य

हे देखील वाचा