×

DIDLil Master’s | अजय देवगण सांगितला ‘त्या’ दिवशीचा थरारक प्रसंग; म्हणाला, ‘लिफ्टमध्ये माझ्यासोबत…’

अजय देवगण (Ajay Devgan) आणि रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) लवकरच ‘डीआयडी लिटिल मास्टर्स’ या डान्स रिअॅलिटी शोमध्ये त्यांच्या ‘रनवे ३४’ चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसणार आहेत. शोमध्ये अजय आणि रकुलने खूप धमाल केली. यादरम्यान अजय देवगणनेही त्याच्या सगळ्यात मोठ्या भीतीवरून पडदा उचलला.

यावेळी अजय देवगणने त्याच्या लिफ्टबद्दलच्या फोबियाबद्दल खुलासा केला. अभिनेत्याने सांगितले की, “काही वर्षांपूर्वी मी लिफ्टमध्ये काही लोकांसह होतो. तेव्हा ती अचानक खाली गेली आणि तिसर्‍या मजल्यावरून तळमजल्यावर प्रचंड वेगाने पडली. यावेळी कोणीही गंभीर जखमी झाले नाही. आम्ही जवळपास १ ते १.५ तास लिफ्टमध्येच अडकलो होतो.” (did little masters ajay devgn share his biggest phobia on show)

अजय देवगण म्हणाला की, आजही तो लिफ्टमध्ये गेला तर त्याला थोडं टेन्शन येतं. यादरम्यान अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) हिनेही तिच्या सगळ्यात मोठ्या भीतीवरून पडदा उचलला. ती म्हणाला की, “मला अजूनही पोहता येत नाही. मला पाण्याची खूप भीती वाटते.” यादरम्यान कुमार सानूही (Kumar Sanu) गंमतीत म्हणाले की, त्यांना भुताची भीती वाटते. म्हणूनच ते आई आणि वडिलांच्या मध्ये झोपायचे.

View this post on Instagram

A post shared by ZEE TV (@zeetv)

‘रनवे ३४’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला समीक्षकांकडून भरभरून दाद मिळाली आहे. या चित्रपटात अजय आणि रकुल व्यतिरिक्त अमित बच्चन, बोमन इराणी, अंगिरा धर, आकांक्षा सिंग आणि अविनाश कुरी हे कलाकार आहेत. अजय देवगणने या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post